Just another WordPress site

भारत जोडो यात्रेवर दु:खाचे सावट, यात्रेतील दोघांना ट्रकने उडविले, एकाचा मृत्यू

नांदेड: राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली निघालेली भारत जोडो यात्रा (Bharat Jodo Yatra) सध्या नांदेड जिल्ह्यातून जात आहे. या यात्रेत गुरुवारी रात्री ९च्या सुमारास एक अपघात झाला. यात्रेत सहभागी झालेल्या दोघांना ट्रकने उडवले, या घटनेत एकाचा मृत्यू झाला तर दुसरा किरकोळ जखमी झाला आहे.

भारत जोडो यात्रेचा नांदेड जिल्ह्यातील चौथा दिवस होता. नवीन मोंढा परिसरातील सभा झाल्यानतंर यात्रा महादेव पिंपळगाव येथील कॅम्पकडे रवाना झाली. रात्री नऊच्या सुमारास महादेव पिंपळगाव येथील नांदेड-अकोला महामार्गावरून पायी चालणाऱ्या गणेशन (६२) आणि सययुल (३०) या दोघांना ट्रकने धडक दिली. त्यांना तातडीने सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारादरम्यान गणेशन यांचे निधन झाले. तर सययुल याच्यावर उपचार सुरू आहेत. हे दोघेही तामिळनाडूचे रहिवासी आहेत.

अपघाताचे वृत्त कळताच माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण आणि आमदार मोहन हंबर्डे यांनी तात्काळ रुग्णालयात धाव घेतली. रात्री साडेबारापर्यंत चव्हाण रुग्णालयात होते. गणेशन यांच्या डोक्याला गंभीर जखम झाल्याने त्यांचे निधन झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!