Just another WordPress site

सत्ताधाऱ्यांचं पोट भरेना, स्वच्छतेच्या नावाखाली १७६ कोटींचा चुराडा ! वडेट्टीवारांचा सरकारवर निशाणा

मुंबई : टेंडर प्रक्रियेला (Tender Process) बगल देऊन खास ठेकेदाराचा खिसा भरण्यासाठी वैद्यकीय शिक्षण विभागाने (Department of Medical Education) बाह्य यंत्रणेद्वारे स्वच्छतेच्या नावाखाली १७६ कोटींचा चुराडा करण्याचा डाव आखला आहे, असा आरोप विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी केला आहे. या कामासाठी सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्यांकडून एक्सप्रेशन ऑफ इंटरेस्ट मागवले आहेत. ही संपूर्ण प्रक्रिया बेकायदेशीर असून ती रद्द करा, अशी जोरदार मागणीही वडेट्टीवार यांनी केली आहे.

ईव्हीएम बाबत अफवा पसरविणाऱ्यांवर कारवाई करणार; मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांचा इशारा 

बुधवारी, यासंदर्भात बोलताना वडेट्टीवार म्हणाले, वैद्यकीय, आयुर्वेद, दंत, होमिओपॅथी महाविद्यालय आणि रुग्णालयांमध्ये बाह्य यंत्रणेद्वारे स्वच्छता करण्यामागे सत्ताधाऱ्यांचा सरकारी तिजोरी लुटण्यासाठीचा डाव आहे. स्थानिकांचा रोजगार हिरावून घेतानाच ठरावीक दलालांचे खिसे भरण्याचा प्रयत्न सुरू आहे. टेंडर न काढता प्रकल्प सल्लागार नेमून त्याच्या माध्यमातून मर्जीतल्या ठेकेदाराला थेट काम देता यावे यासाठी वैद्यकीय शिक्षण विभागाद्वारे ही प्रक्रिया राबवली जात आहे.

नार्वेकरांकडेच राष्ट्रवादी आमदार अपात्रताप्रकरणी निकालाची जबाबदारी; म्हणाले, ‘निवडणूक आयोगाच्या निकालाचा संबंध नाही…’ 

पुढं बोलतांना ते म्हणाले, हे गंभीर आहे. टेंडर प्रसिद्ध होण्याआधी या प्रक्रियेत सामील होण्याची विनंती ठरावीक कंपन्यांना करण्याचा अजब प्रकार वैद्यकीय शिक्षण विभागाकडून सुरू आहे. स्वारस्य अभिव्यक्ती, टेंडर प्रक्रिया राबवण्यासाठी अवघ्या ७ दिवसांचा (२ ते ७ फेब्रुवारी) कालावधी देण्यात आला असून त्यातही सलग दोन सुट्ट्या आहेत. प्री बीड मीटिंग ५ फेब्रुवारी रोजी ठेवण्यात आली आहे. २ तारखेला टेंडर प्रसिद्ध केले आहे. ३ आणि ४ फेब्रुवारी रोजी सुट्टी आहे आणि ५ फेब्रुवारी रोजी प्री बीड मीटिंग आहे. म्हणजेच ज्या कंपन्यांना आधीच पत्र पाठवून प्रक्रियेत सामील होण्यास कळवले आहे, त्या कंपन्या वगळता इतर कोणीही त्यात सहभाग घेऊ नये यासाठी हा सगळा खटाटोप असल्याची आरोपही वडेट्टीवार यांनी केला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!