Just another WordPress site

भाव मिळतील या आशेने साठवलेला कांदा सडला, कांदा उत्पादक पुन्हा संकटात

नाशिक : कांद्याला योग्य बाजारभाव मिळत नसल्याने शेतकरीवर्ग अडचणीत आला. अशातच आता साठवलेला कांदा सडू लागल्याने कांदा फेकून द्यायची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. साठवलेल्या उन्हाळ कांद्यापैकी सत्तर टक्के कांदा चाळीतच सडला आहे.

 

महत्वाच्या बाबी

१. कांदा सडू लागल्याने शेतकरी चिंताग्रस्त
२. सडलेला कांदा पाहून बळीराजा हताश
३. पावसाळी हवामानामुळे साठवलेला कांदा सडू लागला
४. लागवड खर्चही निघत नसल्याने बळीराजा अडचणीत

 

नोव्हेंबर महिन्यात कांद्यावर करपा रोगाचा प्रादुर्भाव झाल्यानं शेतकऱ्यांनी कांद्यावर नांगर फिरवला होता. त्यानंतर त्यांनी पुन्हा नव्या जोमानं कांदा लागवड केली. यापैकी बहुतांश कांदा शेतकऱ्यांनी काढणीनंतर चांगला भाव मिळेल या अपेक्षेने चाळीत साठवला होता. मात्र, साठवलेला कांदा पावसाळी हवामानामुळे सडू लागल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाला.
नाशिक जिल्ह्यातील कळवण तालुक्याती शेतकर्‍यांनी मोठ्या प्रमाणात कांद्याचे उत्पन्न चालू वर्षी घेतले होते. मात्र, बाजारभावाअभावी शेतकर्‍यांनी कांदा साठविणे पसंत केले. मात्र, अद्यापही कांद्याला चांगला भाव मिळालेला नाही. त्यातच सततच्या पावसामुळे साठवलेला कांदा सडू लागला. त्यामुळे काही शेतकरी मिळेल त्या भावात कांदा विकू लागले आहेत. त्यामुळे शेतकर्‍यांचे आथिर्क गणित बिघडले.
आधीच अतिवृष्टीचा सामना अन् त्यातच कांद्याला अपेक्षित भाव नसल्याने कांदा उत्पादक शेतकरी संकटात सापडले. बाजारात कांद्याला मागणी नाही, अशातच कांदा आता सडायला लागल्याचं चित्र आहे. पोटच्या पोरासारखा सांभाळलेला कांदा सडलेला पाहून बळीराजा हताश झाला. सडलेला कांदा उकीरड्यावर फेकून द्यावा लागला. उरला सुरला कांदा सडण्याच्या भितीने आतापर्यंत अखेर पर्यंत कवडीमोल भावातच विकावा लागला.
अनेक दिवसापासून कांद्याचे भाव पडल्याने शेतकऱ्यांनी भावाच्या आशेने साठवलेला कांदा सडला आहे. त्यामुळं शेतकऱ्यांचे नुकसान झालंय. सडलेल्या कांद्याला भाव मिळत नसल्याने कांदा साठवूनही प्रत्यक्षात लाभ होत नसल्याने शेतकरी निराश झाले.
अनेक महिन्यांपासूनचा कांदा साठवणीचा खर्च, लागवडीपासून करण्यात आलेला खर्च, मजुरी, औषध फवारणी, खते याचा याचा खर्च निघणंही मुश्किल असल्याचं शेतकरी सांगताहेत. त्यामुळं उदरनिर्वाह तरी कसा करायचा याची चिंता शेतकऱ्यांना लागली.
Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!