Just another WordPress site

मोनालिसाचा भारतीय पेहरावातला लुक व्हायरल, कसा आहे मोनालिसाचा महाराष्ट्रीयन, बिहारी, गुजराती लुक?

काही गोष्टी असतात ज्या खूप जुन्या असतात किंवा काही गोष्टींच्या सुंदरते विषयी आपण ऐकूण असतो. मग त्यात कधी अप्रतिम अशी वास्तू असो किंवा एखादं चित्र असतं. असंच एक जगप्रसिद्ध चित्र सध्या चर्चेचा विषय ठरतंय. हे चित्र मोनालिसाचं आहे. हे लोकप्रिय चित्र आणि त्याच्या मागे असलेली त्याची कथा तर आपल्या सगळ्यांना माहित आहे. आता या पेन्टिंगचा एक नवा लूक समोर आला. मोनालिसाच्या या पेन्टिंगला आता भारतीय मेकओव्हर देण्यात आल्यानं हा लूक सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरतोय.

 

महत्वाच्या बाबी

१. जगप्रसिध्द ‘मोनालिसाचा’ भारतीय पेहरावातला लुक व्हायरल
२. लिओनार्दो दा व्हिंची यांनी काढले होते मोनालिसाचे चित्र
३. पूजा सांगवानने केला व्हायरल लिसाचा इंडियन लूक व्हायरल
४. लिसाच्या छायाचित्रांवर नेटकऱ्यांकडून कौतूकाचा पाऊस

 

लिओनार्दो दा व्हींची यांनी मोनालिसाचे चित्र काढले होते. मोनालिसांचं पेंटिंग हे एक प्रकारचं कोडं आहे असं देखील काही जण म्हणतात. तिचं गूढ हास्य काही शास्त्रज्ञांना चक्रावून सोडतं. कुणालाही संभ्रमात टाकेल असे चेहऱ्यावर भाव असणारी लिसा आपल्या पारंपरिक पेहरावाऐवजी भारतीय पेहरावात असती तर ती कशी दिसली असती? याचा तुम्ही कधी विचार केलाय का? नसेल केला. तुम्ही म्हणाल हे कसे शक्य. मात्र, ट्विटरवर पूजा नावाच्या एका तरुणीने काही छायाचित्र पोस्ट केले. त्यात मोनालिसा देशाच्या वेगवेगळ्या राज्यांतील असती तर ती कशी दिसली असती. हे यातून दाखवण्याचा प्रयत्न केला. यामध्ये मोना लिसा भारतीय पेहरावात दिसून येत आहे.
पूजा सांगवानने तिच्या पहिल्या ट्विटमध्ये मोनालिसाची दक्षिण दिल्लीतील ‘लिसा मौसी’ दाखवली. दुसऱ्या ट्विटमध्ये मोनालिसाला महाराष्ट्रीयन ‘लिसा ताई’ म्हणून दाखवण्यात आलंय. साडी, मोठी टिकली आणि नथही होती. यामुळं महाराष्ट्रीयन पेहरावात मोनालिसा एकदम महाराष्ट्रीयन मुलगीची वाटत आहे. बिहारची ‘लिसा देवी’ पुढच्या ट्विटमध्ये दिसली. महाराष्ट्र, बिहार, कोलकाता, केरळ, तेलंगण, गुजरात, राजस्थान या राज्यांच्या पारंपरिक वस्त्रांमध्ये मोना लिसा दिसून येते. तिच्या चेहऱ्यावरील स्मित आणि भारतीय पेहराव तिच्या सुंदरतेत अधिक भर घालत आहे. राजस्थानी पेहरावात तिला महाराणी लिसा, बिहारी वस्त्रांमध्ये असलेल्या लिसाला लिसा देवी आणि गुंजराती वस्त्रातील लिसाला लिसा बेन असे संबोधले आहे.
लिसाला भारतीय वस्त्रांमध्ये बघण्याची कोणी कधी कल्पनाही केली नसेल. शेअर केलेली चित्रे खरच अप्रतिम आणि सुंदर आहे. लिसाचे मूळ छायाचित्र जेवढे भूरळ घालते कदाचित तितकेच आकर्षक आता हे छायाचित्र ठरतील. नेटकरी देखील लिसाला विविध वस्त्रांमध्ये पाहून मंत्रमुग्ध झाले आहेत. पूजाने शेअर केलेल्या छायाचित्रांवर प्रतिक्रियांचा पाऊस पडत आहे. कलाकाराची सर्जनशिलता पाहून अनेक नेटकरी आश्चर्य व्यक्त करत आहेत. लिसाच्या छायाचित्रांचे सोशल मीडियावर नेटकऱ्यांकडून भरपूर कौतुक होतेय.

 

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!