Just another WordPress site

मराठा आरक्षणावरून ओबीसी नेत्यांत मतभेद, बबनराव तायवाडेंची भुजबळांविरोधात भूमिका

Maratha Reservation : मराठा समाजाला (Maratha Reservation) कुणबी प्रमाणपत्र (Kunbi certificate) देण्याच्या मुद्यावरून आता ओबीसी नेत्यांतच मतभेद निर्माण झाले आहेत. मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्राच्या माध्यमातून ओबीसी आरक्षण देण्यास राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी कडाडून विरोध केला आहे. याऊलट ओबीसी महासंघाचे अध्यक्ष बबनराव तायवाडे (Babanrao Taiwade) यांनी भुजबळांविरोधात भूमिका घेत सरकारच्या निर्णयामुळे ओबीसी समाजावर कोणताही अन्याय झाला नसल्याचा दावा केला आहे.

राजकीय दबावातून ईडी चौकशी, तब्बल ९ तासांनंतर बाहेर येवून रवींद्र वायकरांची सरकारवर टीका 

छगन भुजबल यांनी नुकतीच ओबीसी नेत्यांची एक बैठक घेत समाजातील ३७४ जातींना एकत्र येऊन १ तारखेला आपापल्या आमदार, खासदार व तहसीलदारांकडे आरक्षणाचा बचाव करण्याचे निवेदन देण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानंतर ओबीसी महासंघाचे नेते बबनराव तायवाडे यांनी भुजबळ यांच्या आंदोलनात सहभागी व्हायचे की नाही याचा निर्णय पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून घेण्याचे संकेत दिले.

कुसुमाग्रज प्रतिष्ठानचे गोदावरी गौरव पुरस्कार जाहीर, 10 मार्चला वितरण, आशुतोष गोवारीकरांसह पाच जणांचा होणार सन्मान 

तायवाडे यांनी राज्य सरकारच्या निर्णयामुळे ओबीसी आरक्षणावर कोणताही कुठाराघात झाला नसल्याचाही दावा केला आहे. सगेसोयरे मसुदा जुन्या मसुद्याप्रमाणे आहे. यामुळे ओबीसींचे वाटेकरी वाढणार नाहीत. मराठा समाजातील कुणबी नोंदी ५७ लाख मिळाल्या आहेत. या नोंदी जुन्याच आहेत. नव्याने कुणबी प्रमाणपत्र वितरीत केल्याची संख्या अत्यंत कमी आहे, असे तायवाडे यांनी जोर देऊन म्हटले आहे.

बबनराव तायवाडे यांच्या या भूमिकेमुळे मराठा आरक्षणावरून ओबीसी नेत्यांतच मतभेद असल्याचे स्पष्ट झाले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!