Just another WordPress site

डॉक्टरांनी लिहिली नीट हस्ताक्षरात औषधांची चिठ्ठी, वाचता येण्याजोगं प्रिस्क्रिप्शन व्हायरल, नेटकरी आश्चर्यचकित

आपण जेव्हा डॉक्टरकडे जातो तेव्हा कधी कधी डॉक्टर आपल्याला बाहेरची औषधं लिहून देतो. डॉक्टर आपल्या विचित्र अक्षरांत या प्रिस्क्रिप्शन लिहून देतो ज्या फक्त मेडिकलवाल्याला कळतात. डॉक्टरांच्या या अक्षरावर अनेक जोक्स, मीम्स इतकेच काय विनोदी व्हिडीओही व्हायरल झाले आहेत. परंतु एका डॉक्टराने सुंदर हस्ताक्षरात औषधाची चिठ्ठी लिहून दिली आहे. डॉक्टरांनी सुवाच्य अक्षरात ही चिठ्ठी लिहिली असून ही अक्षरं छापल्यासारखी वाटतात अशी प्रतिक्रिया काही नेटकर्‍यांनी दिली आहे.

@Thalapathiramki या ट्विटर अकाऊंटवरून ही चिठ्ठी पोस्ट करण्यात आली आहे. केरळच्या एका डॉक्टरांनी ही चिठ्ठी लिहिली आहे. या चिठ्ठीवर डॉक्टरांनी त्यांच्या रुग्णासाठी औषधं लिहून दिली आहे. हे अक्षर इतके सुंदर आहे की नेटकरी डॉक्टरांच्य अक्षराच्या प्रेमात पडले आहे. साधारणतः सामन्य नागरिकांना अशा चांगल्या अक्षरात प्रिस्क्रिप्शन पाहण्याची सवय नसते. आता डॉक्टरांनी एवढ्या सुंदर अक्षरात चिठ्ठी लिहिल्याने ते अचंबित झाले आहे. त्यांनी डॉक्टरांची प्रशंसा केली आहे. एका नेटकर्‍याने आपण आश्चर्यचकित झाल्याचे म्हटले आहे. तसेच एका नेटकर्‍याने हे अक्षर किती सुंदर आहे जणून्काही प्रिटिंग मशीनमधून छापले गेले आहेत असे म्हटले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!