Just another WordPress site

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरला आवरता आला नाही टपरीवरचा चहा पिण्याचा मोह, व्हिडिओ व्हायरल

मुंबई : मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर क्रिकेटच्या मैदानापासून दूर असला तरीही आज सचिनचे सर्वच दिवाने आहेत. क्रिकेटपासून दूर गेल्यानंतर अनेकदा सचिन सर्वसामान्यांप्रमाणे जीवन जगणंच पसंद करतो. मग कधी तो रिक्षातून प्रवास करतो तर कधी घरच्यांसाठी स्वतः कुकिंग करताना दिसतो. क्रिकेटचा गॉड असला तरी सचिनने अद्याप आपला साधेपणा जपला आहे. याचाच प्रत्येय त्याचा सध्याचा व्हिडीओ पाहून येतोय.

सचिननं आपल्या इंस्टाग्रामवर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. ज्यामध्ये तो एका रस्त्याच्या बाजूला असलेल्या छोट्या चहाच्या दुकानात चहा आणि टोस्ट खाताना दिसतोय. गाडी रस्त्याच्या कडेला लावून सचिनने स्वतः या दुकानात जाऊन चहा टोस्ट घेतल्याचे व्हिडिओमध्ये दिसून येतंय. बेळगाव गोवा एक्सप्रेसवरील हा व्हिडीओ आहे. रोड ट्रीपवर निघालेल्या सचिनसोबत यावेळी त्याचा मुलगा अर्जुन देखील असल्याचे व्हिडिओमध्ये पाहायला मिळतंय. ‘रोड ट्रिप पे चाय ब्रेक तो बनता है अशा कॅप्शन खाली सचिनने हा व्हिडीओ शेअर केला आहे.

अगदी साधेपणाने सचिनने सर्वकाही केल्याने दुकानातील सर्वजण चकित झाले. विशेष म्हणजे यावेळी दुकानात असलेल्या मुलासोबत सचिनने सेल्फी देखील काढला. रस्यावर उभं राहून चहा टोस्टचा आनंद घेताना सचिनने आपल्या मुलाला तुला हे हवंय का ? असं विचारलं असता अर्जुन मात्र काहीसा लाजतच गाडीत बसल्याचे यावेळी पाहायला मिळते. मास्टर ब्लास्टरचा हा साधेपणा सर्वांनाच खूप आवडला. म्हणूनच तब्बल १० लाखांहून अधिक जणांनी हा व्हिडीओ लाईक केला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!