मराठीसोबतच बॉलिवूडमध्येही नाव कमावणारी लोकप्रिय अभिनेत्री सई ताम्हणकर सध्या प्रेक्षकांच्या हृदयावर राज्य करतेय. सईने आपल्या अभिनयाने प्रेक्षकांना आपलंस केलंच. सोबतच आपल्या सौंदर्याच्या जोरावर चाहत्यांची वाहवा देखील मिळवली. सई सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. ती नेहमीच तिचे फोटो आणि व्हिडीओ चाहत्यांसोबत शेअर करत असते. आता पुन्हा एकदा सईचं नाव चाहत्यांच्या तोंडी आहे. तिच्या एका फोटोने नेटकऱ्यांना पुन्हा एकदा घायाळ केलं. सईने नुकताच शेअर केलेला एक फोटो चाहत्यांमध्ये प्रचंड चर्चेत आहे.
महत्वाच्या बाबी
१. सई ही मराठी चित्रपटसृष्टीतील आघाडीच्या अभिनेंत्रीपैकी एक
२. सई नुकतीच फिटनेस मॅगझीनच्या कव्हर पेजवर झळकली
३. सईने सोशल मीडियावर शेअर बिकिनी लूकमधील फोटो
४. सई ताम्हणकरच्या च्या या हॉट लूकने केलं नेटकऱ्यांना घायाळ
सई ताम्हणकर ही मराठी चित्रपटसृष्टीतील आघाडीच्या अभिनेंत्रीपैकी एक आहे. सई ताम्हणकर हे नाव आता केवळ मराठी इंडस्ट्रीपुरतं मर्यादीत राहिलेलं नाही. बॉलीवूडमध्येही सई आता आपल्या अभिनयानं अन् त्याहीपेक्षा अधिक आपल्या ग्लॅमरस अंदाजानं भाव खाऊन जाताना दिसते. नुकताच तिनं तिच्या ‘मिमी’ सिनेमातील भूमिकेसाठी उत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीचा फिल्मफेअर पुरस्कार पटकावला. अभिनयाची छाप प्रेक्षकांवर पाडत बॉलिवूडमध्येही स्वत:चं वेगळं स्थान निर्माण करणारी सई अभिनयासह सई तिच्या बोल्ड अंदाजासाठीही ओळखली जाते. ती नेहमी सोशल मीडियावर आपलं हटके अंदाजातलं फोटोशूट शेअर करताना दिसते. सई नुकतीच एका फिटनेस मॅगझीनच्या कव्हर पेजवर झळकली. तो फोटो तिने चाहत्यांसोबत शेअर केला. इन्स्टाग्रामवर हा फोटो शेअर करत सईने लिहिलं, ‘माझ्यासाठी फिटनेस हा एक कठीण पण मन शुद्ध करणारा प्रवास आहे. सातत्य आणि चिकाटी हे कायमच सोबत असतात असा माझा विश्वास आहे. मी आता लिहितानादेखील हे दोन्ही करण्याचा प्रयत्न करतेय. या मॅगझिनच्या कव्हर पेजवर झळकल्याने मला माझ्या शरीराप्रती आणखी कृतज्ञ होण्याची एक संधी मिळाली. मानसिक आणि शारीरिक आरोग्य हे कायम हातात हात घालून चालत असतात हे लक्षात असायला हवं.’ या सोबत तिने तिचा एक हॉट फोटो शेअर केला. ज्यात सईनं ब्रा अन् पॅन्टी इतकेच कपडे अंगावर घातले आहेत. या फोटोमध्ये ती कमाल दिसत आहे.
सईच्या या फोटोवर नेटकऱ्यांनी निरनिराळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. कुणी तिला परमसुंदरीची उपमा दिली आहे तर काहींनी तिच्या सौंदर्याचं कौतुक केलं आहे. सईच्या या हॉट लूकवर मराठीतील अनेक कलाकारांनीही कमेंट्स केल्या. त्यात तेजस्विनी पंडीतनं केलेली कमेंट सध्या भलतीच चर्चेत आहे. तेजस्विनीनं सईच्या या हॉट लूकवर ‘अबब…’ म्हटलं आहे. तर एका युझरने प्रतिक्रिया देत लिहिलं, ‘तू बॉम्ब नाहीयेस तू तर रॉकेट आहेस. खूप छान दिसतेयस.’ आणखी एकाने लिहिलं, ‘अशीच प्रगती करत राहा. आणि आम्हाला घायाळ करत राहा.’ नेटकऱ्यांनी तिच्या फोटोवर लाइक आणि कमेन्टचा वर्षाव केला.