Just another WordPress site

तुर्कीमधील इस्तंबूलच्या गजबजलेल्या भागात भीषण स्फोट; ६ जण ठार, तर ८० हून अधिक जखमी, संशयितांचा शोध सुरू

इस्तंबूल : तुर्कस्तानची राजधानी इस्तंबूलच्या गजबजलेल्या भागात भीषण स्फोट झाला. या स्फोटात ६ जणांचा मृत्यू झाला, तर ८० हून अधिक जण जखमी झाले. एका शॉपिंग मॉलच्या परिसरात रविवारी हा स्फोट झाल्याची माहिती आहे. तुर्की अधिकाऱ्यांनी याला दुजोरा दिला. इस्तंबूलचे गव्हर्नर अली येरलिकाया यांनी सांगितले की, स्थानिक वेळेनुसार सायंकाळी ४.२० वाजता टकसीम स्क्वेअर भागातील एका शॉपिंग स्ट्रीटवर हा स्फोट झाला. हा बॉम्बस्फोट असल्याचं सांगितल्या जातंय. इस्तंबूलच्या सर्वाधिक गजबजलेल्या भागात हा स्फोट झाला. दुर्घटनेवेळी तेथे मोठ्या संख्येने लोक उपस्थित होते. या स्फोटाशी संबंधित एक व्हिडिओदेखील ट्विटरवर व्हायरल झाला. यामध्ये स्फोटाने आगीच्या ज्वाळा उठताना दिसत आहेत. स्फोटानंतर तिथे उपस्थित असलेले लोक पळताना दिसत आहेत.
तुर्कस्तानचे राष्ट्राध्यक्ष रेसेप तय्यप एर्दोगन यांनी हा स्फोट एक हल्ला असल्याचे सांगत आणि दोषींना लवकरच शिक्षा केली जाईल, अशी ग्वाही दिली. मिळालेल्या माहितीनुसार, या हल्ल्यात तीन जण संशयित आहेत. यातील मुख्य संशयित महिला आहे. तिचा कुर्दिस्तान वर्कर्स पार्टीशी संबंध असल्याचे अधिकाऱ्यांचे मत आहे. या महिलेने स्फोटकांनी भरलेली बॅग वाटेत सोडली. त्यानंतर काही मिनिटांतच हा स्फोट झाला. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या स्फोटात दोन पुरुषांचाही सहभाग आहे.
दरम्यान, या स्फोटानंतर आपत्कालीन विभागाच्या लोकांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. स्फोटानंतर रुग्णवाहिका आणि पोलीस घटनास्थळी पोहोचले आहेत. सध्या पोलिसांनी घटनास्थळी नाकाबंदी केली. तर रुग्णवाहिकांनी जखमींना येथून बाहेर काढले. परिसराच्या सुरक्षेसाठी हेलिकॉप्टरही घिरट्या घालत होते. या स्फोटानंतर सर्वत्र एकच खळबळ उडाली असून या घटनेचा पुढील तपास स्थानिक पोलीस करताहेत.

 

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!