Just another WordPress site

गर्लफ्रेंड हवीय, महिन्याला तब्बल २ लाख रूपये सॅलरी; पण, अट अशी की….

बँकॉक : हे सोशल मीडियाचे युग आहे, इथे कधी काय व्हायरल होईल याची कल्पनाही केली जाऊ शकत नाही. एक काळ असा होता जेव्हा आपल्याला हवा तसा पार्टनर अगदी सहज भेटायचा. तर काहींना यासाठी खूपच कष्ट घ्यावे लागायचे. पण हल्ली सोशल मीडियामुळे या गोष्टी सोप्या झाल्या. म्हणजे, आधी एकमेकांना भेटल्यानंतर मैत्री आणि त्यांच रूपांतर प्रेमात व्हायचं. आता सोशल मीडियावरही लाइफ पार्टनर शोधला जातो. गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड शोधण्यासाठी बऱ्याच डेटिंग साइट्स, अॅप आहेत. पण दोन पठ्ठ्यांनी मात्र गर्लफ्रेंड मिळवण्याचा वेगळा मार्ग निवडला. त्यांनी चक्क गर्लफ्रेंडसाठी जाहिरात दिल्याची घटना समोर आली आहे. एवढंच नाही तर तिला महिन्याला तब्बल दोन लाख रुपये पगाराची ऑफरही दिली.
सोशल मीडियावर गर्लफ्रेंड बनण्याच्या जॉबची जाहिरात तुफान व्हायरल होत आहे. आता फक्त गर्लफ्रेंड होण्यासाठी महिन्याला दोन लाख रुपये मिळत असतील तर ते सहजासहजी कसे बरे मिळतील. यासाठी काही अटीही ठेवण्यात आल्या आहेत. या जॉबसाठी इच्छुक असलेल्या महिलांना कोणत्याही प्रकारचं ड्रग्ज व्यसन नसावं. ती कामात चांगली असावी. तिला कोणतीही अडचण किंवा समस्या नसावी आणि महत्त्वाचं म्हणजे तिला चिनी भाषा बोलता यायला हवी, असं या पोस्टमध्ये नमूद करण्यात आलं आहे.
दरम्यान, thethaiger च्या रिपोर्टचा हवाला देत दिलेल्या वृत्तानुसार या नोकरीची पोस्ट आता सोशल मीडियावरून हटवण्यात आली आहे. कारण गर्लफ्रेंडच्या नोकरीसाठी कँडिडेट मिळाली आहे.
Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!