Just another WordPress site

मराठीतील ‘या’ आघाडीच्या दिग्दर्शकाने केली हिंदी वेब सिरीजच्या चित्रीकरणाला सुरुवात

निर्माता दिग्दर्शक रवी जाधवचे विविध चित्रपट बॉक्स ऑफिसवर तगडी कमाई करणारे ठरले आहेत. आता लवकरच रवीचे दिग्दर्शन असणारा ‘टाइमपास ३’ आणि निर्मिती असणारा ‘अनन्या’ हे चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहेत. चाहते या दोन्ही सिनेमांच्या प्रतीक्षेत आहेत. दरम्यान रवी जाधवच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी आहे.रवी जाधव यांनी इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. त्यांच्या पोस्टने अनेकांचं लक्ष वेधलंय.
नटरंग, बालक पालक, मित्रा, बालगंधर्व, न्यूड यांसारख्या वैविध्यपूर्ण विषयांवर रवी जाधव यांनी चित्रपट बनवले आहेत. आइडेंटिटी पासून सेक्शुअलिटी पर्यंत, महत्वपूर्ण सामाजिक विषयांवरील त्यांच्या मराठी चित्रपटांना राष्ट्रीय पारितोषीके प्राप्त झाली आहेत. आता यात इक्वालिटीचा सध्याचा महत्वाचा विषयाची भर पडणार आहे. ते लवकरच हिंदी वेब सिरीज प्रेक्षकांच्या भेटीला आणणार आहे. त्यांच्या या हिंदी वेब सिरीजचं नाव ‘गौरी सावंत’ आहे.
रवी जाधव यांनी नव्या हिंदी वेब सिरीजविषयी सोशल मीडियावर पोस्ट शेअर केलीये. यामध्ये त्यांनी म्हटलं की, ‘आतापर्यंतचा माझ्यासाठी सर्वात आव्हानात्मक विषय माझ्या आगामी हिंदी वेबसिरीजच्या माध्यमातून हाताळण्याचा प्रयत्न करीत आहे. या वेबसिरीजचे चित्रीकरण सध्या पुण्यात सुरु असून लवकरच ती मालिका आपल्या भेटीला येईल’.

 

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!