Just another WordPress site

आजपासून काँग्रेसची ‘भारत जोडो न्याय यात्रा’, १५ राज्यांमधून होणार प्रवास, बेरोजगारी, महागाई मुद्यांवरून भाजपला घेरणार

Bharat Jodo Nyaya Yatra : राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या नेतृत्वात रविवारपासून मणिपूरमधून काँग्रेसची ‘भारत जोडो न्याय यात्रा’ (Bharat Jodo Nyaya Yatra) सुरू होत आहे. मणिपूरची राजधानी इंफाळलगतच्या थोबल येथून सुरू होणाऱ्या या यात्रेचा १९ मार्च रोजी मुंबईत समारोप होईल. लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha elections) तोंडावर यात्रेद्वारे बेरोजगारी, महागाई आणि सामाजिक न्यायाशी संबंधित मुद्दे उचलून धरत भाजपविरोधी (BJP) वातावरणनिर्मितीचा काँग्रेसचा प्रयत्न आहे.

७५ हजार पदभरतीची घोषणा, नगर परिषदांमध्ये केवळ ४० टक्केच पदभरती; कॉंग्रेसचा शिंदे-फडणवीसांवर आरोप 

सुमारे सव्वा वर्षापूर्वी काढलेल्या भारत जोडो यात्रेचा हा दुसरा टप्पा आहे. तेव्हा राहुल गांधींनी कन्याकुमारी ते काश्मीर अशी दक्षिणोत्तर यात्रा काढली होती. आता मणिपूर ते मुंबई असा पूर्वेकडून पश्चिमेकडे प्रवास करण्यात येणार आहे. मणिपूर, नागालँड, अरुणाचल प्रदेश, आसाम, मेघालय, पश्चिम बंगाल, बिहार, झारखंड, ओडिशा, छत्तीसगड, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, राजस्थान, गुजरात आणि महाराष्ट्र असा यात्रेचा मार्ग आहे.

सार्वत्रिक निवडणुकीपूर्वी आयोजित या यात्रेद्वारे ६६ दिवसांत सुमारे १५ राज्यांमधून ६,७१३ किमीचा प्रवास करण्यात येईल. मार्गातील ११० जिल्ह्यांमधील १०० लोकसभा मतदारसंघ आणि ३३७ विधानसभा मतदारसंघांतून यात्रा जाईल.

काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे १४ जानेवारी रोजी हिरवा झेंडा दाखवून यात्रेला रवाना करतील. भारत जोडो यात्रेत राहुल गांधींनी पायी अधिक प्रवास केला होता. त्याउलट या यात्रेतील बहुतांशी प्रवास बसमधून केला जाईल. काही मोजक्या ठिकाणी पदयात्रा असेल. राममंदिर प्रतिष्ठापना सोहळ्याच्या एका आठवड्यापूर्वी सुरू होत असलेली ही यात्रा म्हणजे लोकसभा निवडणुकीत बेरोजगारी, महागाई व सामाजिक न्यायाशी संबंधित मुद्द्यावरून भाजपविरोधात जनमत तयार करण्याचा प्रयत्न असल्याचे मानले जात आहे.

फडणवीसांच्या ‘ओएसडी’च्या परदेश दौऱ्यासाठी १ कोटी ८८ लाखांचा खर्च; रोहित पवारांचा आरोप  

काँग्रेसने भारत जोडो न्याय यात्रा देशासाठी न्याय मागण्याकरिता काढण्यात येत असल्याचा दावा केला. राहुल गांधींनी भारत जोडो यात्रेत आर्थिक असमानता, ध्रुवीकरण, हुकूमशाही हे मुद्दे उचलले होते. तर भारत जोडो न्याय यात्रेद्वारे देशातील लोकांसाठी आर्थिक-सामाजिक- राजकीय न्यायाच्या मागणीवर लक्ष केंद्रित करण्यात येईल, असे काँग्रेस सरचिटणीस जयराम रमेश यांनी सांगितले. सरकार आम्हाला संसदेत बोलू देत नसल्यामुळे आम्हाला यात्रा काढावी लागत असल्याचे गत आठवड्यात खरगे म्हणाले होते.

 

गत महिन्यात २१ तारखेला झालेल्या काँग्रेस कार्यसमितीच्या बैठकीत राहुल गांधी यांनी पूर्वेकडून पश्चिमेकडे भारत जोडो यात्रा काढली पाहिजे, अशी आग्रही मागणी नेत्यांनी केली होती. त्यानंतर यात्रेची घोषणा करण्यात आली. गत काही महिन्यांपासून हिंसाचारात होरपळणाऱ्या मणिपूरच्या जनतेच्या जखमांवर फुंकर घालण्यासाठी या राज्यातून यात्रा सुरू करण्यात येत असल्याचे काँग्रेस सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल यांनी सांगितले.

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!