Just another WordPress site

फडणवीसांच्या ‘ओएसडी’च्या परदेश दौऱ्यासाठी १ कोटी ८८ लाखांचा खर्च; रोहित पवारांचा आरोप 

मुंबई: उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचे विशेष कार्य अधिकारी (ओएसडी) कौस्तुभ धवसे (Kaustubh Dhavse) यांच्यासह पाच अधिकाऱ्यांच्या तैवान दौऱ्यासाठी (Taiwan tours) एक कोटी ८८ लाख रुपये खर्च झाला आहे. मंत्री आणि अधिकाऱ्यांच्या परदेश दौऱ्यांवर महाराष्ट्र औद्योगिक विकास मंडळाने ४५ कोटी रुपये खर्च केले असून ते तिथे कशासाठी गेले होते आणि महाराष्ट्रात किती आर्थिक गुंतवणूक झाली, असे सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी शनिवारी केले.

घराणेशाहीवर घरंदाज माणसानं बोलावं, मोदींना गद्दारांची घराणेशाही प्राणप्रिय; उद्धव ठाकरे कडाडले 

याप्रकरणी महालेखानियंत्रक आणि महालेखापाल (कॅग) यांच्याकडून चौकशी करण्याची मागणी पवार यांनी केली असून त्याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र देणार असल्याचे सांगितले. धवसे यांच्या अनेक कंपन्या असून अशी व्यक्ती उपमुख्यमंत्र्यांची विशेष कार्य अधिकारी कशी होऊ शकते, धवसे यांचा मित्र माहिती व तंत्रज्ञान (आयटी) गैरव्यवहारातील एक आरोपी असून कंत्राट मिळालेल्या कंपनीत धवसे संचालक आहेत, असे पवार म्हणाले.

स्वरसरस्वती प्रभा अत्रेंचं निधन, हृदयविकाराच्या झटक्याने वयाच्या ९२ व्या मालवली प्राणज्योत, संगीत विश्वावर शोककळा 

तलाठी भरती पेपरफुटी आणि गैरव्यवहाराचा मुद्दा उपस्थित करून पवार म्हणाले, नाशिक, सांगली, श्रीगोंदा आदी ठिकाणी भरती परीक्षेचे पेपर फुटले होते. या गैरव्यवहारातील एक आरोपी पोलीस कर्मचारी असून त्याची भरती भाजप सरकारच्या कार्यकाळात झाली होती.

कौस्तुभ धवसे यांनी आरोप फेटाळले

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी केलेले आरोप बिनबुडाचे असल्याचे सांगून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विशेष अधिकारी कौस्तुभ धवसे यांनी सविस्तर स्पष्टीकरण केले आहे. तैवान दौऱ्याचे नियोजन उद्योग विभागाने केले होते आणि तो सुरुवातीला राजकीय पातळीवर केला जाणार होता. पण तैवानचे दौरे राजकीय नेत्यांऐवजी अधिकारी पातळीवर करावेत, असे निर्देश केंद्र सरकारने सर्वच राज्यांना दिले असल्याने तो अधिकाऱ्यांनी करण्याचे ठरले व मुख्यमंत्र्यांनी तसे आदेश दिले. या दौऱ्यात कोणत्या श्रेणीतील अधिकाऱ्याने कोणत्या श्रेणीचे तिकीट काढावे आणि त्याला भत्ते मिळावेत, याबाबत शासननिर्णय आहे. त्यानुसार तिकिटे काढली. वरिष्ठ श्रेणीचे तिकीट काढल्यास अतिरिक्त खर्च अधिकारी असतो. ट्रॅव्हल कंपनी शासकीय विभागास संपूर्ण बिसार फरकाची रक्कम अधिकारी कंपनीला थेट देतो. त्यामुळे संपूर्ण खर्च विभागाने केला, या म्हणण्यात अर्थ नाही, असे धवसे म्हणाले.

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!