Just another WordPress site

शेतकऱ्यांनो, गुड न्यूज, ड्रॅगन फ्रुटच्या शेतीला मिळणार ४ लाख रुपयांचं अनुदान, राज्य सरकारचा निर्णय

मुंबई : शेतकऱ्यांचा कल आता आधुनिक शेतीकडे वाढतोय. कमी वेळेत आणि कमी कष्ट करून शेतीतून जास्तीत जास्त उत्पन्न काढण्यावर शेतकऱ्यांचा भर आहे. शेतकरी त्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी अनेक प्रकारची फळे आणि भाज्या यांचेही उत्पन्न घेऊ लागलेत. यामध्ये त्यांना चांगला नफाही मिळतो. इतर फळांप्रमाणेच ड्रॅगन फ्रुटची लागवड भारतात खूप वेगाने लोकप्रिय होत आहे. मात्र, महाराष्ट्रात केवळ ड्रॅगन फ्रुटची लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांचा टक्का कमी आहे. तो वाढवण्यासाठी महाराष्ट्र सरकारनं ड्रगन फ्रुट शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना मदत करण्याचा निर्णय घेतला.

 

महत्वाच्या बाबी

१. ड्रॅगन फ्रुट शेती करण्यासाठी आता सरकार देणार अनुदान
२. एकात्मिक फलोत्पदान विकास योजनेतून मिळणार अनुदान

 

महाराष्ट्रातील ड्रॅगन फ्रुटच्या शेतीसाठी हेक्टरी १ लाख ६० हजारांचं अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ड्रॅगन फ्रुटच्या लागवडीसाठी अनुदान मिळवायचं असल्यास शेतकऱ्यांना महाडीबीटी ऑनलाइन पोर्टलवर अर्ज दाखल करणं आवश्यक आहे.

किती अनुदान मिळणार?

राज्य सरकारकडून एक हेक्टरवर क्षेत्रावर ड्रॅगन फ्रुट लागवडीसाठी ४ लाख रुपयांचा खर्च निश्चित करण्यात आला आहे. त्यापैकी ४० टक्के रक्कम म्हणजे १ लाख ६० हजार रुपयांचं अनुदान शेतकऱ्यांना तीन टप्प्यात देण्यात येणार आहे. राज्य सरकारनं ड्रॅगन फ्रुट लागवड योजनेसाठी ४ कोटी रुपयांची तरतूद केली आहे. महाडीबीटी ऑनलाइन पोर्टलवर शेतकऱ्यांनी नोंदणीला सुरुवात झाली असून काही ठिकाणी याबाबत सोडत देखील झाल्याचं ड्रॅगन फ्रुट उत्पादक शेतकऱ्यांनी सांगितलं आहे.

किती टप्प्यात मिळणार अनुदान?

ड्रॅगन फ्रुट लागवडीसाठी एकात्मिक फलोत्पादन विकास योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना १ लाख ६० हजार रुपयांचं अनुदान दिलं जाणार आहे. त्यापैकी पहिल्या टप्प्यात ६० क्के म्हणजे ९६ हजार रुपये दिले जाणार आहेत. दुसऱ्या टप्प्यात २० टक्के आणि तिसऱ्या टप्प्यात २० टक्के अनुदान दिलं जाईल.

पात्रता आणि कागदपत्र काय?

ड्रॅगन फ्रुट लागवड अनुदान मिळवण्यासाठी अर्जदार शेतकऱ्याच्या नावावर ०.२० हेक्टर जमीन असणं आवश्यक आहे. या योजनेचा अर्ज ऑनलाइन पद्धतीनं करायचा असून त्यासाठी पासपोर्ट फोटो, सातबारा उतारा, ८ अ चा उतारा, आधार कार्डसोबत जोडलेलं बँक खातं, जातीचा दाखला आणि इतर कागदपत्रं आवश्यक आहेत.
Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!