Just another WordPress site

शेतकऱ्यांची शेती पाण्याखाली, बुलडाण्यात मुसळधार पावसामुळे पिकांची दयनीय अवस्था

बुलडाणा जिल्ह्यात गेल्या आठ ते दहा दिवसांपासून सातत्याने सुरू असलेल्या परतीच्या पावसामुळे खरीप हंगामातील ज्वारी, बाजरी, मका, सोयाबीन आणि कापूस पिकांची दयनीय अवस्था झाली. त्यामुळं हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेल्यामुळे शेतकऱ्यांवर ऐन सणासुदीच्या दिवसात संकट कोसळले.

 

महत्वाच्या बाबी

१. परतीच्या पावसामुळे खरीप पिकांची दयनीय अवस्था झाली
२. बुलडाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पावसाचा मोठा फटका
३. सरसकट हेक्टरी ५० हजार रुपये मदत देण्याची मागणी
४. पिकांचे मोठं नुकसान झाल्यानं बळीराजा कोलमडल्याचं चित्र

 

महाराष्ट्रात गेल्या तीन ते चार दिवसांपासून पावसाने पुन्हा थैमान घालण्यास सुरुवात केली. राज्यातील अनेक भागांमध्ये पावासाचा कहर बघायला मिळतोय. बुलढाणा जिल्ह्यात सलग काही दिवसांपासून काही भागांत पावसाने अक्षरश: दाणादाण उडवली. मुसळधार पावसामुळे शेतात पाणी तुंबले असून सोयाबीन, कपाशीसह अन्य पिकांना पावसाचा चांगलाच फटका बसला. त्यामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले. शेतांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी तुंबल्याने खरिपाची पिके धोक्‍यात आली. शेतकऱ्यांचे पीक पावसाने मातीमोल केली. त्यामुळं शेतकऱ्यांचे यंदा अक्षरश: दिवाळे निघालं.
अगोदरच काही दिवसापासून पावसाने दडी मारली होती यावेळी हे पिके वाचवण्याकरिता शेतकऱ्यांना मोठी धडपड करावी लागली आणि पिके चांगली सुद्धा आली. मात्र, आता पावसाने कहर केल्यानं पिकांचे मोठं नुकसान झालं.
खामगाव तालुक्यात शेतात झालेल्या जोरदार पावसामुळे तलाव, धरण, नाले, विहिरी, मोठ्या प्रमाणात भरले. तर पारखेड शिवारातील सर्व शेतकऱ्यांच्या शेतात पाणी साचल्यानं खरीपातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्यामुळं शेतकरी विवंचनेत सापडला. बियाणे, खते, फवारणी तसेच मशागतीसाठी अतोनात खर्च केला अन् आता पावसानं कहर केल्यानं शेतकऱ्यांनी डोक्याला हात लावला.
सध्या कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. कापसाला आता जागतिक पातळीवर मागणी वाढल्यामुळे कापसाच्या दरात देखील आता सुधारणा व्हायला लागली असून कापसाचे भाव तेजीत आहेत. मात्र, विदर्भातील बऱ्याच भागात कपाशीचं शेतीही शेती पाण्याखाली गेली. त्यामुळं कपाशीची बोंडे मोठ्या प्रमाणात सडली. पावसाच्या या तडाख्यात मोठ्या प्रमाणात शेतकऱ्याचं नुकसान झालंय. त्यामुळे बळीराजा पुरता कोलमडून गेला. दरम्यान, या पिकांवर झालेला खर्च कसा वसूल करायचा असा सवाल बळीराजा करतोय. पाऊस सुरू असल्याने शेतकऱ्यांचा नाईलाज झाला असून, डोळ्यादेखत मोठय़ा कष्टाने उभ्या केलेल्या हंगामाची राखरांगोळी होताना पाहण्याची वेळ बळीराजावर आली. त्यामुळं शासनाने ओल्या दुष्काळाची स्थिती लक्षात घेता नुकसानीचे पंचनामे करण्यात वेळ घालविण्यापेक्षा नुकसानग्रस्तांना सरसकट हेक्टरी पन्नास हजार रुपये मदत देण्याची व्यवस्था करावी, अशी मागणी शेतकरी वर्गातून होतेय.
Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!