Just another WordPress site

‘डबल नोकरी’ करणाऱ्या कर्मचाऱ्यांना विप्रोचा दणका, ३०० कर्मचाऱ्यांना कामावरून काढले

भारतीय माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रातील आघाडीची कंपनी विप्रोने ‘मूनलाइटिंग’बाबत अर्थात एकाच वेळी दोन ठिकाणी काम करणाऱ्या ३०० कर्मचाऱ्यांवर कारवाई केली. गेल्या काही महिन्यांत हे कर्मचारी एकाचवेळी प्रतिस्पर्धी कंपनीचे काम करत असल्याचे आढळून आल्यानंतर त्यांना कामावरून कमी करण्यात आल्याची माहिती कंपनीने दिली. दरम्यान, कंपनीच्या या कठोर कारवाईमुळे आता मात्र ३०० कर्मचाऱ्यांवर बेरोजगारीची कुऱ्हाड पडली.

 

महत्वाच्या बाबी

१. ‘मूनलाइटिंग’बाबत आयटी क्षेत्रातील कंपन्यांची चिंता वाढली
२. विप्रोचे ३०० कर्मचारी स्पर्धकांसाठी काम करताना आढळले
३. ‘मूनलाइटिंग’चा कंपनीच्या गुणवत्तेवर परिणाम होतो – विप्रो
४. इन्फोसिसने देखील दिला दुहेरी रोजगाराबाबत कडक इशारा

 

अनेक कर्मचारी एकावेळी दोन कंपन्यांमध्ये काम करत असतात. अशावेळी याचा परिणाम कंपनीच्या रिझल्टवर होतो. त्यामुळे अनेक कंपन्या कर्मचाऱ्यांच्या अशा वर्तनाविरुद्ध कठोर निर्णय घेत असल्याचे दिसून आले. नवीन प्रथा म्हणून ‘मूनलाइटिंग’बाबत माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपन्यांची चिंता वाढली. गेल्या महिन्यात २० ऑगस्टला विप्रोचे संचालक रिशाद प्रेमजी यांनी सर्वप्रथम याबाबत आश्चर्य आणि चिंता व्यक्त करताना, हा कंपन्यांशी केला जाणारा विश्वासघात असल्याचं सांगितलं होतं.
तसंच या क्षेत्रातील दुसरी आघाडीची कंपनी इन्फोसिसनेदेखील कंपनीच्या आचारसंहितेनुसार, कोणीही कर्मचारी एकाच वेळी दोन ठिकाणी काम करू शकत नाही. कोणी कर्मचारी तसे करताना आढळल्यास त्यावर कारवाई करण्यात येईल, परिणामी, त्यांना नोकरी गमवावी लागू शकते, असं स्पष्ट करून कारवाईचा इशारा दिला. इतर नोकऱ्या करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई केली जाणार आहे.
इन्फोसिस कंपनीत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना दोन ठिकाणी काम किंवा ‘मूनलाइटिंग’ करण्याची परवानगी नसणार आहे. इन्फोसिसने कर्मचाऱ्यांना १२ सप्टेंबर रोजी पाठवलेल्या ई-मेलमध्ये सांगितलं की, जर ते मूनलाइटींग करत असतील तर त्यांची कंपनीतून हाकालपट्टी केली जाईल. तर आता विप्रोमध्ये कार्यरत असतानाच स्पर्धक कंपनीसोबतही काम करताना आढळल्याने विप्रो कंपनीने ३०० कर्मचाऱ्यांना नारळ दिला.
विप्रोचे अध्यक्ष रिशाद प्रेमजी यांनी याबाबत माहिती दिली. त्यांनी सांगितले की, कंपनीचे ३०० कर्मचारी एकाच वेळी त्यांच्या एका स्पर्धकांसोबत काम करत असल्याचे आढळल्याने ही कारवाई करण्यात आली आहे. रिशाद प्रेमजी यांनी मूनलाईटिंगला कडाडून विरोध केला आहे. त्यांनी आपल्या वक्तव्यावर ठाम राहताना मूनलाईटिंग हा पूर्णत: नैतिकतेचे उल्लंघन करणारं असल्याचे सांगितलं. त्या आयटी क्षेत्रात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे या कठोर कारवाईमुळे चांगलेच धाबे दणाणले. दरम्यान, कर्मचारी हे या कारवाईतून काही धडा घेणार का, अन् अन्य क्षेत्रातील कंपन्या देखील या कारवाईमुळे प्रेरित होऊन मुनलाईटींगच्या संदर्भात काय पावलं उचलणार हेच पाहणं महत्वाचं आहे.
Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!