Just another WordPress site

वरिष्ठ पदांवर नेतृत्व करण्याऱ्या महिलांचा टक्का वाढला, भारतात महिला बॉसची संख्या दुप्पट झाली

आजच्या युगात महिला कोणत्याच क्षेत्रात पुरुषांच्या मागे नाहीत. जर आपण व्यवसाय आणि उद्योजकतेबद्दल बोलायचे झाल्यास त्यातही महिलांचाही मोठा वाटा आहे. काही काळापर्यंत महिला बॉस ही कल्पना लोकांना करवत नव्हती. मात्र आता चित्र चांगलंच बदललंय. गेल्या पाच वर्षांच्या कालावधीमध्ये जगातील सर्वच देशांमध्ये महिला बॉसच्या संख्येमध्ये लक्षणीय वाढ झाली.

 

महत्वाच्या बाबी

१. महिला कोणत्याच क्षेत्रात पुरुषांच्या मागे नाहीत
२. जगात महिला बॉसच्या संख्येमध्ये लक्षणीय वाढ
३. भारतात महिला बॉसची संख्या दुप्पट वाढली
४. महिलांनी सुरू केलेल्या उद्योगांची संख्या दीड कोटी

 

केवळ भारताचा विचार करता २०१७ नंतर महिला बॉस असण्याचे प्रमाण तब्बल दुपटीने वाढले. ग्रांट थॉरटन या आघाडीच्या संस्थेने आपला २०२२ अहवाल नुकताच जाहीर केला असून त्यामध्ये ही माहिती प्रसिद्ध करण्यात आली.
जगभरातील २९ पेक्षा जास्त देशातील दहा हजार कंपन्यांचा अभ्यास या सर्वेक्षणासाठी करण्यात आला. निष्कर्षप्रमाणे २०१७ मध्ये जगभरात महिला बॉसची संख्या २५ टक्‍के होती. २०२२ मध्ये हे प्रमाण ३८ टक्‍केपर्यंत वाढले आहे. शिक्षण क्षेत्रात सर्वात जास्त ३० टक्‍के, तर बांधकाम क्षेत्रामध्ये सर्वात कमी १४ टक्‍के महिला बॉस आहेत. शिक्षण क्षेत्रामध्ये महिलांची संख्याही सर्वाधिक आहे. माध्यम क्षेत्रात महिला बॉस असण्याचे प्रमाण २३ टक्‍के असून आयटी क्षेत्रातील हे प्रमाण २० टक्‍के आहे.
महिला बॉस कर्मचार्‍यांच्या व्यावसायिक वाढीकडे अधिक लक्ष देतात आणि त्यांना अधिक चांगल्या प्रशिक्षणाची आवश्यकता असल्यास त्या नेहमी तयार असतात. शिवाय, महिला बॉसमध्ये करार करताना वाटाघाटीद्वारे योग्य निर्णय घेण्याची क्षमता पुरुषांपेक्षा खूपच चांगली असते. महत्वाचं म्हणजे, महिला सामाजिकदृष्ट्या भिन्न लोकांच्या संपर्कात येतात. यामुळे त्यांच्यात संभाषणातून चांगले संबंध प्रस्थापित करण्याची क्षमता अधिक असते. या कारणांमुळे महिला वरिष्ठ पदांसाठी पुरूषांना वरचढ ठरतात. गेल्या तीन वर्षांच्या कालावधीमध्ये करोना महामार्गामुळे वर्क फ्रॉम होम ही जी नवीन कार्यसंस्कृती निर्माण झाली त्याचा फायदा महिलांना झाल्याचे या अहवालात सांगितले. गेल्या पाच वर्षांच्या कालावधीमध्ये जे नवीन स्टार्टअप सुरु झाले, त्यापैकी ४५ टक्‍के स्टार्टअप महिलांनी सुरू केले. विशेष म्हणजे स्वतःचा व्यवसाय उभारणीत आणि रोजगार देण्यात सुद्धा भारतीय महिला पुढे आहेत. इंडिया ब्रांड इक्विटी फौंडेशन रिपोर्ट नुसार देशातील ४५ टक्के स्टार्टअपच्या मालक महिला आहेत आणि मध्यम लघु उद्योग क्षेत्रात सुद्धा महिलांचे प्रमाण २० टक्के आहे. देशात सध्या सुमारे ४५ कोटी महिला कोणते ना कोणते काम करत असतात. तर महिलांनी सुरू केलेल्या छोट्या-मोठ्या उद्योगांची संख्या तब्बल दीड कोटी आहे. त्यातून त्यांनी २.२ ते २.७ कोटी लोकांना रोजगार दिला. २०३० पर्यंत महिलांनी सुरू केलेल्या अशा छोट्या मोठ्या उद्योगांची संख्या ३ कोटीपर्यंत पोहोचेल आणि या उद्योगामध्ये १५ कोटी पेक्षा जास्त लोकांना रोजगार दिला जाईल असंही या अहवालात सांगितलं.
Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!