Just another WordPress site

राज्यघटनेत ‘बजेट’ असा शब्दच नाही, मग बजेट हा शब्द आला तरी कुठून? काय आहे बजेट या शब्दाच्या जन्माची गोष्ट?

‘बजेट’ हा शब्द आपल्या आयुष्यातील अविभाज्य घटक आहे. दरवर्षी सादर होणाऱ्या अर्थसंकल्पाकडे सगळ्यांचे लक्ष लागलेले असते. या अर्थसंकल्पासाठी आपण अगदी सर्रास ‘बजेट’ असा शब्द वापरतो. यंदाचं बजेटसत्र ३१ जानेवारीपासून सुरू होणार आहे. तर १ फेब्रुवारी रोजी बजेट सादर केलं जाणार आहे. पण तुम्ही विचार केला आहे का हा शब्द नक्की आला कुठून? या अर्थसंकल्पाला बजेट का म्हटलं जातं? त्यामागचा नेमका इतिहास काय आहे? काय आहे बजेट या शब्दाच्या जन्माची गोष्ट? याच विषयी जाणून घेऊ.

‘बजेट’ हा शब्द आपल्या आयुष्यातील अविभाज्य घटक आहे. आपल्या उत्पन्नातून किती पैसे आपण कशाकशावर खर्च करणार याच्या अंदाजाला आपण सर्वसाधारणपणे ‘बजेट’ असं म्हणतो. बजेट हा मुळचा फ्रेंच शब्द आहे. या शब्दाची निर्मिती फ्रेंच शब्द ‘बुजेत’पासून झाली आहे. या शब्दाचा अर्थ ‘चामड्याची पिशवी’ असा होतो. फ्रेंच मंडळी पैसे सुरक्षित ठेवण्यासाठी चामड्याच्या पिशवीचा वापर करत. या पिशवीला ते ‘बुजेत’ असे म्हणत.

‘बजेट’ शब्द प्रचलित होण्यामागे एक गंमतीदार किस्सा आहे. १७३३ साली इंग्लंडचे माजी अर्थमंत्री सर रॉबर्ट वॉलपोल वार्षिक अर्थसंकल्प सादर करण्यासाठी संसदेत आले होते. येताना त्यांनी स्वत:सोबत एक चामड्याची पिशवी देखील आणखी होती. याच पिशवीत त्यांनी अर्थसंकल्पाचे कागदपत्र ठेवले होते. ती पिशवी खोलताना त्यांनी ‘बुजेत इज ओपन’ असे म्हटले. परंतु ‘बुजेत’ हा शब्द त्यांनी अशा प्रकारे उच्चारला की सभागृहातील इतर मंडळींना तो ‘बजेट’ असा ऐकू आला. त्यानंतर विरोधकांनी रॉबर्ट वॉलपोल यांची खिल्ली उडवण्यासाठी व आर्थिक नियोजनातील चुका दाखवण्यासाठी ‘बजेट इज ओपन’ या नावाने एक पुस्तिका प्रकाशित केली. परंतु वॉलपोल देखील कच्चे खेळाडू नव्हते. त्यांनी ही खिल्ली खिलाडूवृत्तीने स्विकारत बुजेतला ‘बजेट’ असेच म्हणायला सुरुवात केली. आणि तेव्हापासून बुजेतचे ‘बजेट’ असे नामकरण झाले.

भारतीय राज्यघटनेत अर्थसंकल्प हा शब्द वापरलेला नसून वार्षिक वित्तीय विवरणपत्रक (Annual Financial Statement) हा शब्द वापरण्यात आला आहे. भारतामध्ये घटनेच्या ११२व्या कलमानुसार केंद्र सरकारचा तर २०२व्या कलमानुसार राज्य सरकारचा अर्थसंकल्प मांडला जातो. मात्र असं असलं तरी भारताच्या राज्यघटनेत अर्थसंकल्प या शब्दाचा उल्लेख नाहीय याबद्दल अनेकांना आश्चर्य वाटतं.

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!