Just another WordPress site

दिवसातून रोज एक-दोन लवंग खाल्ल्याने होतील ‘हे’ आश्चर्यकारक फायदे

भारतीय मसाल्यांमध्ये असे काही पदार्थ आहेत. जे आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतात. त्यातच लवंग ही शरीरासाठी प्रत्येक प्रकारे फायदेशीर आहे. लवंग आपल्या घरात आढळणारी एक सामान्य गोष्ट आहे. दैनंदिन आहारात बरेचसे पदार्थ हे लवंगीशिवाय अपुरे आहेत म्हणून प्रत्येक घरात लवंग आढळतेच. केवळ भारतच नाही तर अख्ख्या जगात लवंगीला मोठी मागणी आहे. एका फ्लॉवर बडच्या रुपात लवंग पूर्ण जगात प्रसिद्ध आहे आणि लोक याचा मोठ्या प्रमाणावर वापर सुद्धा करतात. पण मंडळी लवंग केवळ खाद्यपदार्थाला स्वाद आणण्यासाठी वापरली जात नाही तर हिचे काही औषधी गुणधर्म सुद्धा आहेत. अनेक प्रकारच्या आरोग्याच्या समस्यांवर लवंगीचा प्राचीन काळापासून वापर केला जात आहे. सर्वात जास्त मौखिक स्वच्छतेसाठी लवंगचा वापर केला जातो. तोंडाशी निगडीत अनेक समस्या लवंग वापरल्याने दूर होतात. याशिवाय, पचनक्रिया मजबूत करण्यासाठी लवंगाचे सेवन फायदेशीर मानले जाते. दुसरीकडे, जर तुम्ही दररोज रात्री लवंगाचे सेवन केले तर ते ब्लड शुगर लेवल तुलित ठेवण्यास मदत करू शकते. याशिवाय, लवंग खाण्याचे आणखी काय फायदे आहेत जाणून घेऊया.

शरीरावरील सूज

लवंगात दाहक-विरोधी गुणधर्म असतात. ज्यामुळे तुम्ही सूज किंवा दुखत असताना लवंगाचे सेवन करू शकता. ज्या लोकांना दातदुखी किंवा शरीराच्या कोणत्याही भागात दुखत असेल तर ते लोक रात्रीच्या वेळी लवंगाचे सेवन करू शकतात किंवा ज्या भागात सूज आहे तेथे लवंगाच्या तेलाची मालिश करू शकतात. असे केल्याने तुम्हाला वेदना आणि सूज यापासून आराम मिळेल.

भूक लागणार नाही

काहींना रात्री जेवणाची क्रेविंग होते. अशा स्थितीत तुम्ही लवंगाच्या साह्याने क्रेविंग दूर करू शकता. त्यामुळे लवंगा दुधात टाकून पिऊ शकता किंवा तुम्ही थेट लवंगा खाऊ शकता. यामुळे तुम्हाला रात्री जेवणाची क्रेविंग होणार नाही. लवंगात फायबर असते जे तुमची भूक नियंत्रित करते.

तोंडात फोड येणे

सामान्यत: तोंडात फोड येण्यामागे कारणीभूत असतं साफ न झालेलं पोट! यापासून बचाव व्हावा म्हणून लोक नाना विविध उपाय करून पाहतात. मात्र कुटून बारीक केलेली लवंग १५ ते २० मिनिटे तोंडात ठेवल्याने तोंडातील फोडांच्या समस्येपासून मोठा आराम मिळतो. जे लोक तोंडातील फोडांच्या समस्येमुळे त्रस्त आहेत त्यांनी बारीक कुटलेली लवंग दिवसातून ३ ते ४ वेळा आपल्या तोंडात १५ ते २० मिनीटांसाठी ठेवावी. असं केल्याने तोंडातील फोडांच्या समस्येपासून लवकर आराम मिळतो.

खोकल्यावर उपचार

खोकल्यावर उपचार करण्यासाठी तुम्ही लवंग वापरू शकता. कोमट पाण्यात लवंग मधात मिसळून घेतल्याने सर्दी-खोकल्याची समस्या दूर होते. त्याच वेळी, लवंग आणि मधाच्या मिश्रणात बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंध करणारा पदार्थ आणि अँटीव्हायरल गुणधर्म असतात. त्यामुळे हे मिश्रण तुमच्या शरीरासाठी फायदेशीर आहे.

लवंग पुरुषांसाठी फायदेशीर

लवंगाच्या नियमित सेवनाने लैंगिक समस्यांपासून आराम मिळतो. लवंगाचे सेवन केल्याने शुक्राणूंची संख्या वाढण्यास मदत होते. आपण त्याचे जास्त प्रमाणात सेवन करणे टाळावे, कारण जास्त प्रमाणात सेवन केल्याने पुरुषातील टेस्टोस्टेरॉन हार्मोनला त्रास होऊ शकतो, म्हणून लवंग आणि त्याच्याशी संबंधित उत्पादने आयुर्वेदाचार्यांच्या देखरेखीखालीच वापरावीत.
Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!