Just another WordPress site

दहा लाखांपर्यंत INCOME असूनही वाचवता येतो कर, कर वाचवण्यासाठी काय क्लृपत्या आहेत?

तुम्हाला ठाऊक असेल की, भारतात दोन प्रकारचे कर भरावे लागतात एक म्हणजे, प्रत्यक्ष कर आणि दुसरा अप्रत्यक्ष कर. यात अप्रत्यक्ष कर टाळण्याचा कोणताही मार्ग नाही, पण प्रत्यक्ष कर नक्कीच कमी करता येतो. नोकरीतून किंवा व्यवसायातून मिळणारं वार्षिक उत्पन्न १० लाख रुपयांपर्यंत असलं तर तुम्हाला आता इन्कम टॅक्सभरण्याची गरज नाही. तुम्ही तुमचा पूर्ण टॅक्स वाचवू शकता. फक्त यासाठी तुम्हाला व्यवस्थित टॅक्स प्लॅनिंग करावं लागेल. ते कसं करावं? याच विषयी जाणून घेऊ.

वेतनात वाढ होते, तसा करही वाढतो. कर वाचवण्यासाठी तुम्हाला अनेक जण सल्ले देतील. पण योग्य सल्लाच तुम्हाला फायदेशीर ठरतो. खरंतर इन्कम टॅक्सबाबत असे अनेक नियम आणि तरतुदी आहेत, ज्यामुळे तुम्हाला टॅक्स डिडक्शनची सुविधा मिळते. या पैकी, कलम 80C सर्वांत लोकप्रिय आहे. याशिवाय, हाउसिंग लोन, एज्युकेशन लोन आणि हेल्थ पॉलिसीचा वापर करूनदेखील टॅक्स वाचविता येऊ शकतो.

पीपीएफमध्ये गुंतवणूक केल्यास करात सूट

कर वाचवण्यासाठी पीपीएफ हा फार पूर्वीपासूनचा एक बचतीचा पर्याय आहे. पीपीएफमध्ये जमा केलंलं भांडवल, व्याज आणि मॅच्युरिटी रक्कम हे सर्व करमुक्त असतं. या अंतर्गत, प्रत्येक आर्थिक वर्षात तुम्हाला आयकर कलम 80C अंतर्गत १.५ लाख रुपयांचे डिडक्शन मिळू शकते.

होम लोनवर टॅक्स सवलत

सरकारी नोकरदारांना होम लोनवर टॅक्स सवलत मिळते. त्यामुळं तुम्हाला तुमचा टॅक्स कमी करायचा असेल तर तुम्ही होम लोनमधील डिडक्शनचा फायदा घेऊ शकता. तुम्ही एका आर्थिक वर्षात गृहकर्जाच्या व्याजावर दोन लाख रुपयांपर्यंत डिडक्शनचा क्लेम केल्यास वार्षिक उत्पन्नातील आणखी दोन लाख रुपये कमी होतील. त्यामुळे तुमचं टॅक्सेबल इन्कम सहा लाख रुपये होईल.

मेडिक्लेम पॉलिसी घेऊन वाचवा कर

मेडिक्लेम पॉलिसी खरेदी करण्यासाठी वार्षिक २५ हजार रुपये खर्च करून कर सूट मिळू शकते. तुम्ही स्वतःसाठी, मुलांसाठी आणि पत्नीसाठी मेडिक्लेम पॉलिसी खरेदी करू शकता.

देणगी दिल्यास टॅक्स सवलत

जर तुम्ही सामाजिक कार्यासाठी दान देत असला तर तुम्हाला त्यावर २५ हजार रुपयांची सूट मिळते. असं झाल्यास तुम्ही पाच लाख रुपयांच्या टॅक्स स्लॅबमध्ये येता. तुम्हाला पाच लाख रुपयांसाठी पाच टक्क्यांच्या हिशोबानं १२ हजार ५०० रुपये कर भरावा लागेल. मात्र, कलम ८७A अंतर्गत, तुम्हाला पाच लाख रुपयांच्या टॅक्स स्लॅबवर १२ हजार ५०० रुपयांची कर सवलत मिळेल. परिणामी, तुम्हाला पाच लाखांच्या टॅक्स स्लॅबमध्ये एक रुपयाही टॅक्स भरावा लागणार नाही.

सुकन्या समृद्धी योजना

भारत सरकारने २०१४ पासून देशात सुकन्या समृद्धी योजना सुरू केली. मुलींचं भविष्य सुरक्षित करण्याच्या उद्देशाने सुरू करण्यात आलेल्या या योजनेला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळतो. सुकन्या समृद्धी योजनेतील गुंतवणुकीत पहिल्या वर्षासाठी ९ टक्के व्याजदर मिळतो. त्यापुढे ७.५ टक्क्यांपेक्षा जास्त व्याज मिळतं. सुकन्या समृद्धी योजना अंतर्गत गुंतवणूक केल्यास आयकरात सूट मिळण्याची तरतूद करण्यात आलीये. .

मुदत ठेव

पाच वर्षांपेक्षा जास्त कालावधीच्या मुदत ठेवीच्या रकमेवरही आयकरातून सूट मिळू शकते. वेगवेगळ्या बँकांमध्ये व्याजदर वेगवेगळे असतात. सध्या उपलब्ध असलेल्या इतर गुंतवणुकीच्या मार्गांच्या तुलनेत मुदत ठेव हा पर्याय फारसा लोकप्रिय मानला जात नाही.

मुलांची ट्यूशन फी

तुमचं पगाराचं उत्पन्न असेल तर २ मुलांपर्यंतच्या शिक्षणावरही कर बचत करता येते. तुम्ही दोन मुलांपर्यंतच्या शिक्षणासाठी कलम 80 सी अंतर्गत १.५ लाख रुपयांच्या कर कपातीचा दावा करू शकता.

दरम्यान, या सरकारी योजनांमध्ये गुंतवणूक केल्यास तुम्ही सहज कर बचत करू शकता.

 

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!