Just another WordPress site

बनावट – खोट्या नोटांचं प्रमाण वाढलं, खोट्या नोटा तुमच्याकडे आल्या तर त्या कशा ओळखायच्या? RBI काय सांगते?

कोरोनानंतर अनेक जण डिजिटल पेमेंटकडे वळले आहेत. त्यामुळे नोटावापरण्याची सवय आणि प्रमाण दोन्ही कमी झालं आहे. पटकन आपल्याकडे ५०० किंवा २००० रुपयांची नोट आली तर आता खरी आहे की खोटी हे तुम्हाला कसं कळणार? जेव्हा ती नोट दुकानात किंवा बँकेत दिली जाईल तेव्हाच समोराचा जर तुम्हाला म्हणाला तर ती खोटी आहे तर तुमचं खूप मोठं नुकसान होऊ शकतं. खोट्या नोटा तुमच्याकडे आल्या तर त्या कशा ओळखायच्या याबाबत RBI ने नियम सांगितले आहेत.

५०० आणि २००० रुपयांच्या नोटा कशा ओळखायच्या याबाबत RBI ने काही खाणाखुणा सांगितल्या आहेत. १७ वेगवेगळ्या गोष्टी पडताळून तुम्ही नोट खरी आहे की नाही याची माहिती घेऊ शकता. यामध्ये अगदी छोटं अंतर असतं पण ते कळणं फार महत्त्वाचं आहे. नाहीतर मोठं नुकसान होऊ शकतं.

 

कोणत्या गोष्टी लक्षात घ्यायच्या?

– ५०० किंवा २ हजार रुपयाची नोट तुम्ही लाईट समोर पकडली तर तुम्हाला ५०० रुपये लिहिलेलं दिसेल.
– डोळ्यासमोर ४५ डिग्रीमध्ये नोट पकडली तर तुम्हाला ५०० रुपये लिहिलेलं दिसेल
– देवनागरीमध्ये ५०० किंवा २००० रुपये लिहिलेलं असेल
– महात्मा गांधी यांचा फोटो एकदम सेंटरमध्ये दिसेल
– भारत आणि India लेटर्स लिहिलेले दिसतील
– जर तुम्ही ही नोट हलक्या हाताने दुमडली तर सिक्युरिटी थ्रीडीच्या रंगाचा रंग हिरवा ते निळा असा बदलताना दिसेल
– वर्नर सिग्नेचर, गॅरेंटी क्लॉज, मिस क्लॉज आणि RBI लोगो उजव्या बाजूला देण्यात आला आहे
– महात्मा गांधीजींचा फोटो तुम्हाला पलिकडच्या बाजूला वॉटरमार्कमध्ये छापलेला दिसेल
– नोटेच्या वर डाव्या बाजूला आणि खाली उजव्या बाजूने नंबर वाढताना दिसतात
– ५०० रुपयांच्या नोटेवर रंगही बदलतो
– याशिवाय उजव्या बाजूला अशोक स्तंभ आहे
– उजव्या बाजूला सर्कल बॉक्स आहे ज्यामध्ये ५०० लिहिलेलं आहे. राइट आणि लेफ्ट साइडला ५ ब्लीड लाइन्स आहेत
– नोटेच्या छपाईचे वर्ष लिहिले आहे.
– स्वच्छ भारताचा लोगो घोषवाक्यासह छापलेला आहे.
– मध्य बाजूला भाषेचे पॅनेल आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!