Just another WordPress site

इंदूरमध्ये येताच बॉम्बने उडवून देऊ; निनावी पत्र लिहून राहुल गांधी यांना धमकी, पोलिसांचा तपास सुरु

इंदुर: भारत जोडो यात्रा मध्य प्रदेशमध्ये येण्याआधी इंदुरमध्ये राहुल गांधी यांना धमकी देणारी चिठ्ठी मिळाल्याने एकच खळबळ उडाली आहे. या चिठ्ठीत राहुल गांधी यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी तातडीने तपासास सुरूवात केली आहे.

काँग्रेसचे खासदार आणि माजी अध्यक्ष राहुल गांधी यांना बॉम्बने उडवण्याची धमकी देणारे एक पत्र इंदुरमध्ये मिळाले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार धमकी देणारे हे पत्र शुक्रवारी सकाळी एका मिठाईच्या दुकानाबाहेर अज्ञात व्यक्ती सोडून गेली. चिठ्ठी मिळाल्यानंतर पोलिसांनी तातडीने परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करण्यास सुरूवात केली आहे.

काय म्हटले आहे चिठ्ठीत…

राहुल गांधी यांना धमकी देण्यात आलेल्या या चिठ्ठीत म्हटले आहे की, भारत जोडो यात्रा इंदुरमध्ये पोहोचल्यावर राहुल गांधी यांना बॉम्बने उडवण्यात येईल. पोलिसांनी अज्ञात व्यक्तीच्या विरोधात कलम ५०७ नुसार गुन्हा दाखल करून चौकशी सुरू केली आहे. राहुल गांधींची भारत जोडो यात्रा सध्या महाराष्ट्रात आहे. दोन दिवसांपूर्वी त्यानी सावरकर यांच्या संदर्भात केलेल्या वक्तव्यावरून जोरदार राडा सुरू झाला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!