Just another WordPress site

‘छत्रपती शिवराय हे जुन्या काळातील’; राज्यपालांचं वादग्रस्त वक्तव्य

औरंगाबाद : महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि ज्येष्ठ नेते शरद पवारांची तुलना थेट छत्रपती शिवाजी महाराजांशी केली आहे. तुलना करुनही ते थांबले नाहीत तर छत्रपती शिवराय हे जुन्या काळातील आदर्श असल्याचं म्हणत शिवाजी महाराज तो पुराने जमाने के आदर्श है, अभी तुम्हारे सामने नितीन गडकरी जैसे आदर्श है, असं वादग्रस्त वक्तव्य राज्यपालांनी केलं. राज्यपालांच्या वक्तव्याने नवा वाद रंगण्याची चिन्हे आहेत.

कधी सावित्रीबाई फुलेंवरील वक्तव्यामुळे तर कधी शिवाजी महाराजांच्या गुरुंवर केलेल्या वक्तव्यामुळे, अगदी महिनाभरापूर्वी महाराष्ट्राचे उद्योग गुजरातला जात असलेल्या काळात मराठी माणसांना कमी लेखल्यामुळे राज्यपाल वादाच्या भोवऱ्यात सापडले. आज गडकरी आणि पवारांचं मोठेपणा सांगताना राज्यपालांनी बोलण्याच्या नादात छत्रपती शिवरायांची तुलना थेट गडकरींशी केली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या ६२ वा दीक्षांत समारंभा संपन्न झाला. याच कार्यक्रमात शरद पवार आणि नितीन गडकरी यांना डी. लिट पदवी देऊन सन्मानित करण्यात आलं.

राज्यपाल कोश्यारी म्हणाले, “आम्ही जेव्हा शाळेत जायचो, तेव्हा आम्हाला आमचे शिक्षक विचारायचे, तुमचे आवडते नेते कोण आहेत? मग ज्यांना सुभाषचंद्र बोस चांगले वाटायचे, ज्यांना नेहरू चांगले वाटायचे, ज्यांना गांधीजी चांगले वाटायचे ते त्या त्या व्यक्तींचं नाव घ्यायचे. मला असं वाटतं की जर कुणी तुम्हाला विचारलं की तुमचे आवडते हिरो किंवा आदर्श कोण आहेत? तर बाहेर कुठे जायची गरज नाही. इथेच महाराष्ट्रात तुम्हाला ते मिळतील. महाराष्ट्र नवरत्नांची खाण आहे. शिवाजी तर जुन्या काळातले आदर्श आहेत. मी नव्या युगाविषयी बोलतोय. डॉक्टर आंबेडकरांपासून डॉ. नितीन गडकरींपर्यंत सगळे तुम्हाला इथेच मिळतील”

पुढे बोलताना राज्यपाल म्हणाले, गडकरी आणि पवार यांना पदवी देण्याचं मला भाग्य लाभलं. या नेत्यांचं कार्य राष्ट्राला उपयोगी असल्याने त्यांना ही पदवी दिली गेली. मात्र त्यांचे कार्य त्यापेक्षा अधिक आहे. शरद पवार यांनी शेती क्षेत्रात प्रचंड काम केलंय. त्यामुळे ते साखरेपेक्षा अधिक गोड वाटतात. नितीन गडकरी तर ध्येय असणारे नेते आहेत, त्यांना रोडकरी या नावानेही ओळखलं जातं. दोन्ही नेत्यांचं मोठं काम आहे.”

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!