Just another WordPress site

नागरिकांनो लक्ष द्या! १ जानेवारीपासून Online Payment च्या नियमांसह ‘या’ नियमांत होणार बदल; तुमच्या खिशावर कसा होणार परिणाम?

प्रत्येक नवीन महिना आपल्यासोबत काही नवे बदल घेऊन येतो, जे सर्वसामान्यांसाठी खूप महत्त्वाचे असतात. काही दिवसांनी नवीन वर्ष सुरू होत असून अनेक बदलांसह नवीन वर्षाची सुरुवात होतेय. बँक लॉकर, क्रेडिट कार्ड आणि मोबाईलशी संबंधित अनेक नियमांमध्ये बदल होणार आहेत. यासोबतच गॅस सिलिंडरच्या किमती आणि वाहनांच्या किमतीही वाढू शकतात. या सर्व बदलांचा थेट परिणाम तुमच्या खिशावर होणार आहे. या बदलांकडे दुर्लक्ष केल्यास तुमचे आर्थिक नुकसानही होऊ शकतं. त्यामुळे जाणून घेऊया १ जानेवारीपासून नेमके काय बदल होणार आहेत?

बँक लॉकरचे नवीन नियम

रिझर्व्ह बँकेने सर्वसामान्यांच्या सुविधेसाठी बँक लॉकरसंबंधित नवे नियम जाहीर केले. या नियमांची १ जानेवारी २०२३ पासून अंमलबजावणी केली जाईल. हा नियम लागू झाल्यानंतर लॉकरबाबत बँकेच्या मनमानी कारभाराला ब्रेक लागेल. बँक लॉकरमध्ये ठेवलेल्या मालाचे नुकसान झाले तर त्याची जबाबदारी आता बँकेची असेल. याशिवाय आता ग्राहकांना ३१ डिसेंबरपर्यंत बँकेसोबत करार करावा लागेल. या कराराद्वारे ग्राहकांना लॉकरच्या नियमांमध्ये झालेल्या बदलाची माहिती एसएमएसच्या माध्यमातून बँकेला द्यावी लागेल.

क्रेडिट कार्डचे नियम बदलणार

१ जानेवारीपासून क्रेडिट कार्डच्या नियमांमध्ये बदल होणार असून हा बदल क्रेडिट कार्डद्वारे पेमेंट केल्यावर मिळालेल्या रिवॉर्ड पॉइंटशी संबंधित असेल. नवीन वर्षाच्या सुरुवातीपासून HDFC बँक क्रेडिट कार्ड पेमेंटवर मिळालेले रिवॉर्ड पॉइंटचे नियम बदलणार आहे. अशा परिस्थितीत, ग्राहकांना ३१ डिसेंबर पूर्वी त्यांच्या क्रेडिट कार्डमध्ये उर्वरित सर्व रिवॉर्ड पॉइंट्स भरण्याचा सल्ला देण्यात आलाय. नवीन नियमांनुसार १ जानेवारीपासून रिवॉर्ड पॉइंट सुविधा प्रदान केल्या जातील.

जीएसटीच्या नियमात होणार बदल

१ जानेवारीपासून जीएसटीचे नियमही बदलणार आहेत. सरकारने २०२३ पासून जीएसटीच्या ई-इनव्हॉइसिंगसाठी २० कोटींची मर्यादा ५ कोटीपर्यंत कमी केली. हा नवीन नियम १ जानेवारी २०२३ पासून लागू होत असून ज्या व्यापाऱ्यांचा व्यवसाय ५ कोटींहून अधिक आहे, त्यांनी ई-इनव्हॉइस तयार करणे आवश्यक आहे.

ऑनलाईन पेमेंटच्या नियमात बदल

१ जानेवारीपासून ऑनलाईन पेमेंट करताना प्रत्येकवेळी कार्ड नंबर आणि एक्सपायरी डेट द्यावी लागणार, म्हणजेच या डिटेल्स आधीसारख्या सेव्ह राहणार नाहीत. आरबीआयच्या गाईडलाईननुसार हा निर्णय घेण्यात आला आहे. ऑनलाईन पेमेंट सुविधा अधिक सुरक्षित व्हावी यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.

एलपीजीच्या किंमती

दर महिन्याच्या १ तारखेला सिलिंडरच्या किमती बदलतात. नवीन वर्षाच्या सुरुवातीला देखील सरकारकडून एलपीजीबाबत एक चांगली घोषणा केली जाऊ शकते. गेल्या काही काळात कच्च्या तेलाच्या किमतीत सातत्याने घसरण होत आहे. अशा परिस्थितीत, नवीन वर्षात सरकारी तेल कंपन्या घरगुती गॅसच्या किमती कमी करू शकतात.

कार होणार महाग

नवीन वर्षात कारचे दर वाढणार आहेत. मारुती सुझुकी, हुंडाई मोटा, टाटा मोटर्स, मर्सिडिझ बेंझ, ऑडी, रेनॉल्ड, किआ इंडिया आणि एमजी मोटर यांच्या कारच्या किमतींमध्ये १ जानेवारी २०२३ पासून वाढ होणार आहे.

आयएमईए नंबरचं रजिस्ट्रेशन आवश्यक

१ तारखेपासून प्रत्येक फोन निर्माता आणि त्याची आयात आणि निर्यात करणाऱ्या कंपनीसाठी प्रत्येक फोनच्या आयएमईए नंबरचं रजिस्ट्रेशन करणं आवश्यक आहे.

विंडोज ७ मध्ये वापरता येणार नाही गुगल क्रोम

गुगलकडुन क्रोम सपोर्टबाबत एक निर्णय जाहीर करण्यात आला आहे. १ जानेवारीपासून विंडोज ७ आणि विंडोज ८.१ साठी गुगल क्रोमचे नवे वर्जन सपोर्ट बंद करण्यात येईल. म्हणजेच ज्यांच्या लॅपटॉपमध्ये विंडोज ७ आणि विंडोज ८.१ आहे, त्यांना गुगल क्रोम वापरता येणार नाही.ज्यांचे लॅपटॉप जुने आहेत, त्यांना याची अडचण येऊ शकते.

 

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!