Just another WordPress site

ऐन सुणासुदीच्या काळात रेपो दरात वाढ, पाहा तुमच्या खिशावर काय परिणाम होईल?

महागाईला रोखण्यात केंद्र सरकाला मोठे अपयश येत आहे. त्यामुळे भारतीय रिझर्व्ह बँकेने मोठे पाऊल उचलूनही महागाई रोखण्यात यश आलेलं नाही. अर्थव्यवस्थेतेत मोठी उलथापालथ होत असताना भारतीय अर्थव्यवस्था मात्र मजबूत उभी आहे, असे जरी सांगितले जात असलं तरी महागाईत वाढ होतेय. या महागाईला रोखण्यासाठी आणि रुपयांची घसरण रोखण्यासाठी RBI ने रेपो दरात अर्धा टक्का वाढ केली.

 

महत्वाच्या बाबी

१. आरबीआयने चौथ्यांदा रेपो दरात केली वाढ
२. गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी दिली माहिती
३. आरबीआयने रेपो रेट ५० bps ने वाढला
४. रेपो दर वाढल्यामुळं गृहकर्ज महाग होणार

 

आरबीआयने सलग चौथ्यांदा व्याजदरात वाढ केली. रिझर्व्ह बॅंकेकडून रेपो दरात ५० बेसिस पॉईंट्सची वाढ करण्यात आली. रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी बैठकीत घेतलेल्या निर्णयांची माहिती दिली. दास यांनी सांगितले की, पॉलिसी रेपो रेट ५० बेसिस पॉइंट्सने वाढवून ५.९% करण्यात आला. महागाईवर नियंत्रण मिळवण्यासाठी हा निर्णय घेतल्याचं त्यांनी सांगितलं. मात्र, सणासुदीच्या काळात ही दरवाढ केल्यानं ग्राहकांच्या खिशाला चांगलीच कात्री लागणार आहे. या निर्णयानंतर शेअर मार्केटमध्ये बँकांच्या शेअरमध्ये तेजी पाहायला मिळाली.
आरबीआय बँकांना ज्या दराने कर्ज देते तो दर म्हणजे रेपो दर. रेपो दर वाढल्याचा सरळ अर्थ असा आहे की, बँकांना रिझर्व्ह बँकेकडून जास्त दराने कर्ज मिळेल. अशा परिस्थितीत, बँका ही वाढ ग्राहकांना हस्तांतरित करतात, ज्यामुळे त्यांच्यासाठी कर्जाचे दर देखील महाग होतात. यामुळे केवळ नवीन कर्जे महाग होतातच, शिवाय, पूर्वीपासून चालू असलेले गृहकर्ज किंवा वाहन कर्ज यांचा ईएमआयही वाढतो. याचा वैयक्तिक कर्जाच्या ईएमआयवर परिणाम होणार नसला तरी नवीन वैयक्तिक कर्जे महाग होतील. याचा सर्वसामान्य लोकांवर मोठा परिणाम होईल. कारण बँकांचा कर्ज घेण्याचा खर्च वाढणार आहे. यानंतर बँका त्यांच्या ग्राहकांवर बोजा टाकण्याचे काम करतील.
थोडक्यात काय तर रेपो वाढल्यामुळं बँकांच्या कर्जाचा खर्च वाढणार आहे. ते कर्ज बँका ग्राहकांना देतील आणि त्यामुळे गृहकर्ज महाग होईल. तसेच, एमसीएलआर, बेस रेट आणि बीपीएलआरशी जोडलेल्या जुन्या गृहकर्जांवरही त्याचा परिणाम होईल. अशा परिस्थितीत घर घेणं आवाक्याबाहेर जाण्याची शक्यता आहे. शिवाय वाहन कर्ज आणि इतर कर्जही महाग होतील.
रेपो रेट वाढल्यामुळे गृह कर्जाचे ईएमआय अधिक महाग होतील. ज्या बँकेकडून तुम्ही गृहकर्ज घेतले आहे, त्या बँकेचा गृहकर्ज दर पूर्वी ८.१० टक्के होता आणि तुम्ही हे कर्ज २० वर्षांच्या कालावधीसाठी घेतले आहे. अशा परिस्थितीत, पूर्वी तुम्हाला ३० लाख रुपयांच्या कर्जावर २५ हजार २८० रुपये ईएमआय भरावे लागत होते, मात्र, आता तुम्हाला २६ हजार २२५ रुपये द्यावे लागतील. एक उल्लेखनीय बाब अशी की, जेव्हा रेपो दरात वाढ होते, तेव्हा ग्राहकांचा खर्च तर वाढतो, पण सोबत काहीसा आनंदही मिळतो. कारण, जेव्हा रेपो दर वाढतो तेव्हा बचत, आणि मुदत ठेवींवरील व्याजदरातही ग्राहकांना फायदा होतो.
Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!