Just another WordPress site

‘मला मोदीही संपवू शकणार नाहीत’; पंकजा मुडेंची भाजपवर नाराजी का आहे?

मी जनतेच्या मनात असेल तर मला पंतप्रधान मोदी देखील हरवू शकत नाहीत, असं वक्तव्य पंकजा मुंडे यांनी केलंय. पंतप्रधान मोदींच्या वाढदिवसानिमित्त सेवा पंधरवाड्याचे आयोजन अंबाजोगाई इथं करण्यात आलंय. त्या कार्यक्रमात पंकजा मुंडे बोलत होत्या. त्यावेळी त्यांनी सुचक विधान करून आपली नाराजी बोलून दाखवली. दरम्यान, पंकजा मुंडे भाजपवर नाराज आहेत का? त्यांच्या नाराजीची नेमकी कारणं काय? याच विषयी जाणून घेऊ.

 

महत्वाच्या बाबी

१. ‘मला मोदीही संपवू शकणार नाहीत’ – पंकजा मुडे
२. सुचक विधान करून त्यांनी बोलून दाखवली नाराजी
३. ४-५ वर्षांत अनेकदा पंकजांनी नाराजी उघड केली
४. राज्यपाल नियुक्त सदस्यांमध्ये पंकजांची वर्णी लागेल का?

 

जनतेच्या मनात असलेल्यांना मोदीही संपवू शकत नाहीत असं पंकजा मुडेंनी वक्तव्य करताच राज्याच्या राजकारणात अनेक तर्कवितर्क लढवले जाताहेत. गेल्या चार ते पाच वर्षांत पंकजांनी वेळोवेळी प्रत्यक्ष-अप्रत्यक्षरीत्या पक्षावरची नाराजी उघड केली.
सध्या राष्ट्रीय पातळीवर भाजपमध्ये महत्त्वाच्या घडामोडी घडताहेत. भाजपच्या संघटनात्मक पातळीवरच्या महत्वाच्या नेमणुका नुकत्याच जाहीर झाल्या. त्यात नितीन गडकरी यांना संसदीय मंडळ आणि केंद्रीय निवडणूक समितीतून वगळण्यात आलंय. यानंतर महाराष्ट्र भाजपमधेही मोठे फेरबदल झाले. महत्वाचं म्हणजे, चंद्रकांत पाटील यांची कॅबिनेट मंत्रिपदी वर्णी लागल्यामुळे चंद्रशेखर बावनकुळे भाजपचे नवे प्रदेशाध्यक्ष झाले. मात्र, या पदासाठी पंकजा मुंडे इच्छुक होत्याचं बोलल्या जातं. मात्र, त्यांना डावलून बावनकुळे यांच्याकडे प्रदेशाध्यक्षपद देण्यात आलं. त्यामुळं त्या नाराज असल्याचं राजकीय जाणकार सांगतात.
खरंतर पंकजा मुंडे यांच्या नाराजीची अनेक कारण आहेत. मात्र, पुर्वी त्या नाराजी जाहीरपणे बोलत नसतं. याआधी महाराष्ट्रातून केंद्रात मंत्रिपदी नारायण राणे, डॉ. भारती पवार, भागवत कराड आणि कपिल पाटील या मंत्र्यांची वर्णी लागली. केंद्रीय मंत्रिमंडळ विस्ताराची जेव्हा चर्चा आता जोर धरु लागलीय. तेव्हा खासदार प्रीतम मुंडे यांच्या नावाची चर्चा होती. प्रीतम मुंडे यांना गोपीनाथ मुंडे यांचा मोठा वारसा आहे. राज्यातील ओबीसी चेहरा म्हणूनही प्रीतम मुंडे यांच्याकडे पाहिलं जातं. त्यामुळे कदाचित केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारात प्रीतम मुंडे यांना स्थान दिलं जाऊ शकतं, असा त्यावेळी चर्चचा सुर होता. मात्र, भाजपन प्रितम मुंडेंना नाकारून भागवत कराड यांना मंत्रिमंडळात स्थान दिलं. त्यामुळं पंकजा मुंडे नाराज होत्या, असं राजकीय जाणकार सांगतात. भागवत कराड यांच्या नियुक्तीनंतर, पंकजा जाहिरपणे नाराजी बोलून दाखवत नाही, कारण, त्यांना साईडलाईन केलं असलं तरी भविष्यात चांगल्या पदाची अपेक्षा असावी होती. विधानपरिषदेत तरी आपलं पुनर्वसन होईल, अशी आशा पंकजा मुंडेंना होती. मात्र, प्रितम मुंडेना मंत्रीमंडळातून डावलण्याची मनातील अस्वस्थता आणि शल्य त्यांना तेव्हा लपवता आलं नाही. नंतर काही महिन्यांपूर्वी राज्यातील १० जागांसाठी विधान परिषदेच्या निवडणुका झाल्या. या निवडणुकीत भाजपने पंकजा मुंडे यांचा पत्ता कट करून प्रवीण दरेकर, प्रसाद लाड, राम शिंदे या दिग्ग्ज नेत्यांसोबतच भाजपने उमा खापरे आणि श्रीकांत भारतीय या दोन नव्या चेहऱ्यांनाही विधान परिषदेची संधी दिली. त्यामुळं आता पंकजा मुंडे जाहीरपणे आपली नाराजी बोलून दाखवताहेत. पूर्वी जनतेच्या मनातील मुख्यमंत्री असे वक्तव्य केल्याने त्यांची महत्त्वाकांक्षा लपून राहिलेली नाही. मंत्रिमंडळात स्थान न मिळणे, राज्यसभेसाठी डावलले जाणे, विधान परिषदेतही हुलकावणी या साऱ्या बाबींमुळे पंकजा मुंडे नाराज आहेत.
२०१९ मध्ये विधानसभेच्या निवडणुकीत धनंजय मुंडेंनी पंकजा मुंडे यांचा पराभव केला. त्यानंतर अद्याप भाजपने त्यांचं पुनर्वसन केलं नाही. म्हणायला, पंकजांची राष्ट्रीय चिटणीस म्हणून नियुक्ती केली गेली. मात्र महत्त्वाचे आणि शक्तिशाली असे सरचिटणीसपद त्यांना मिळालेले नाही. आता तर त्यांना बिहारसारख्या महत्त्वाच्या राज्याचे सहप्रभारीपद देण्यात आलं. मात्र, पंकजांना तशी कोणतीही मोठी जबाबदारी संघटनेत देण्यात आली नाही. खरंतर पंकजांनाही मानणारा मोठा वर्ग बीड आणि लगतच्या जिल्ह्यांमध्ये आहे. सोशल मीडियावर पंकजांचे समर्थक मोठ्या प्रमाणात सक्रिय आहेत. अलिकडच्या काळात सोशल मीडीयावर वातावरण तयार केले जाते. त्यातून काही प्रमाणात मतांचे ध्रुवीकरण होते. त्यामुळे पंकजांना दुखावणे भाजपला परवडणारे नाही. तसेच राज्यपातळीवर चुकीचा संदेश जाईल हे भाजप लक्षात आलं. त्यामुळेच त्यांच्या वक्तव्यावर भाजप नेत्यांच्या फारशा प्रतिक्रिया आल्या नाही. दरम्यान, आता राज्यपाल नियुक्त सदस्यांमध्ये पंकजांची वर्णी लागेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. पक्ष संघटनेत किंवा सरकारमध्ये पंकजांना महत्त्वाचे स्थान द्यावे ही त्यांच्या कार्यकर्त्यांची अपेक्षा आहे. अन्यथा वेळोवेळी त्यांची नाराजी व्यक्त होत राहणार हे नक्की. त्यामुळं राज्यपाल नियुक्त सदस्यांमध्ये पंकजांची वर्णी लागेल का आणि सावरगाव घाट येथील दसरा मेळाव्यात पंकजा मुंडे काय बोलणार, हेच पाहणं महत्वाचं आहे.
Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!