Just another WordPress site

तुम्हाला नवल वाटेल! अवघ्या २५ व्या वर्षी ऋषभ पंतकडे आहे करोडोंची मालमत्ता, महिन्याला कमावतो ‘इतके’ कोटी

मुंबई : भारतीय संघाचा स्टार खेळाडू ऋषभ पंतच्या कारचा ३० डिसेंबरच्या सकाळी अपघात झाला. उत्तराखंडमध्ये रुरकीकडे जाताना ऋषभच्या कारला भीषण अपघात झाला, त्यानंतर कारने पेट घेतला. सकाळी जवळपास पाचच्या सुमारास हा अपघात झाला. या अपघातानंतर ऋषभ पंत गंभीररित्या जखमी झाला असून त्याच्या अपघाताचे अनेक फोटो आणि व्हिडिओ समोर आले आहेत. केवळ २५ वर्षीय पंतने क्रिकेट जगतात आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. ऋषभ त्याच्या आक्रमक फलंदाजीसाठी ओळखला जातो. भारतीय संघाला त्याने अनेकदा विजय मिळवून दिला आहे. भारतीय क्रिकेट संघामध्ये आल्यानंतर ऋषभ पंतच्या संपत्तीत मोठी वाढ झाली असून तो कोट्यवधी रुपयांच्या संपत्तीचा मालक आहे.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, २०२० मध्ये पंतची कमाई २९.१९ कोटी रुपये होती. तर २०२१ मध्ये पंतची एकूण संपत्ती ५ मिलियन डॉलर होती. सध्या ऋषभचं एकूण नेटवर्थ जवळपास ८.५ मिलियन डॉलर जवळपास ७० कोटी रुपये आहे. ऋषभला लक्झरिअर कार्सची आवड आहे. त्याच्या कार कलेक्शमध्ये मर्सिडिज, ऑडी ८ आणि फोर्ड अशा कार्स आहेत.

ऋषभ पंतची वार्षिक कमाई

ऋषभ ब्रँड एंडोर्समेंटद्वारे मोठी कमाई करतो. ऋषभ Dream11, RealMe, Boat, SG, Noise आणि Cadbury ब्रँड्सचं एंडोर्समेंट करतो. त्याद्वारे त्याची वर्षाला २ मिलियन डॉलरहून अधिक कमाई होते. ऋषभ मूळचा उत्तराखंडचा असला, तरी तो आता तो दिल्लीत राहतो. ऋषभने दिल्लीकडूनही क्रिकेट सामने खेळले असून आता तो भारतीय संघाच्या स्टार खेळाडूंमध्ये सामील आहे.

अंडर -१९ वर्ल्ड कप

ऋषभला भारतीय संघाचा आगामी काळातील लीडर म्हणूनही ओळखलं जातं. आयपीएलमध्ये तो दिल्ली कॅपिटल्स संघाचा कर्णधार आहे. पंत पहिल्यांदा अंडर – १९ वर्ल्ड कप २०१६ मध्ये भारतासाठी खेळला होता. त्यावेळी ऋषभ १८ चेंडूमध्ये अर्धशकत करुन चर्चेत आला होता.

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!