Just another WordPress site

रामायणातील सीता मातेची भूमिका साकारणाऱ्या दीपिका चिखलियाचा मॉडर्न अंदाज पाहून नेटकरी भडकले

रामानंद सागर यांच्या ‘रामायण’ मालिकेत अभिनेत्री दीपिका चिखलिया यांनी सीतेची भूमिका साकारली होती. या मालिकेमुळं त्यांना देशभरात प्रचंड लोकप्रियता मिळाली. या भूमिकेमुळं प्रेक्षकांच्या मनात दीपिका यांची एक वेगळीच ओळख निर्माण झालीये. आजही प्रेक्षक त्यांच्या ‘माता सीता’ याच भूमिकेची आठवण काढतात. नुकताच त्यांनी एक व्हिडीओ इन्स्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट केला. या व्हिडीओमुळे त्यांना नेटकरी ट्रोल करताहेत.

८० च्या दशकात रामानंद सागर यांची ‘रामायण’ ही मालिका तुफान लोकप्रिय झाली होती. मालिकेतील व्यक्तिरेखा आणि ती साकारणाऱ्या कलाकारांना आजही प्रेक्षक विसरू शकले नाहीत. अरूण गोविल यांनी साकारलेला राम आणि दीपिका चिखलिया यांनी साकारलेली सीता आजही प्रेक्षकांच्या स्मरणात आहे. अनेक जण आजही अरूण गोविल यांना ‘राम’ तर दीपिका चिखलिया ‘सीता’ म्हणूनच ओळखतात. सध्या दीपिका यांचा मॉडर्न अवतार पाहून चाहते चांगलेच भडकले आणि त्यांनी दीपिका यांना ट्रोल करायला सुरूवात केली. दीपिका चिखलिया या सोशल मीडियावर सक्रिय असतात. दीपिका यांनी नुकताच एक खास व्हिडिओ शेअर केला.

या व्हिडीओमध्ये दीपिका यांनी ‘ओ मेरे शोना रे’ या गाण्यावर डान्स ठेका धरल्याचं दिसतंय. या व्हिडीओला दीपिका यांनी कॅप्शन दिलं, ‘आयुष्य हे एका गाण्यासारखं आहे. ते गाणं गायचं आणि त्यावर डान्स करायचा.’ व्हिडीओमध्ये दीपिका या नाकात नथ, पिवळा ड्रेस आणि गोल्डन इरिंग्स आशा लूकमध्ये दिसत आहेत. दीपिका यांच्या या व्हिडीओनं अनेकांचं लक्ष वेधलं. क्रीम कलरचा शरारा परिधान करून त्यांनी हा डान्स केला. मात्र त्यांचा हा मॉडर्न अंदाज नेटकऱ्यांना आवडला नाही. दीपिका यांनी हा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केल्यानंतर अनेक नेटकऱ्यांनी त्यांना ट्रोल करण्यास सुरुवात केली. अनेकांनी त्यांच्यावर टीका केली. तर काहींनी त्यांना इन्स्टाग्रामवर अनफॉलो करणार असल्याचाही इशारा दिला. डान्सच्या या व्हिडीओमुळे दीपिका यांच्या प्रतिमेला धक्का पोहोचत असल्याचं युजर्सनी म्हटलंय. ‘या वयात आपल्या प्रतिमेला धक्का पोहोचेल अशी गोष्ट का करताय’, असा सवाल एका नेटकऱ्याने केला. तर ‘सीतेच्या भूमिकेमुळे जो सन्मान तुम्हाला मिळाला, ते आवडलं नाही वाटतं. अरूण गोविल यांच्याकडून काही शिका’, अशा शब्दांत दुसऱ्या युजरने दीपिका यांना खडसावलं. ‘तुम्हाला सर्वजण सीता मातेच्या रुपात पाहतात. कृपया अशा पद्धतीचे व्हिडीओ पोस्ट करू नका’, असंही एकाने लिहिलं. तर आणखी एकानं लिहिलंय की, माताजी, तुम्हाला अनफॉलो करतोय. कारण मी तुम्हाला अशा अवतारात बघू शकत नाहीये, असं लिहित आपला संताप व्यक्त केलाय.
‘रामायण’ मालिकेत सीता मातेची भूमिका साकारल्यानंतर दीपिका यांनी विक्रम वेताळ, लव कुश या मालिकांमध्येही काम केलं होतं. याशिवाय, त्यांनी रुपये दस करोड, घर का चिराग आणि खुदाई या चित्रपटांमध्ये देखील काम केलं होतं. ‘रामायणा’मुळे मिळालेल्या लोकप्रियतेच्या लाटेवर स्वार होत त्यांनी १९९१ मध्ये लोकसभेची निवडणूक जिंकली. पण, काही वर्षांनी त्यांनी राजकारणालाही रामराम ठोकला होता. दरम्यान, सोशल मीडियावर व्हिडोओ पोस्ट केल्यानंतर त्या पुन्हा एकदा चर्चेत आल्या.

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!