Just another WordPress site

जग महामंदीच्या उंबरठ्यावर! सहा महिन्यांत हजारो लोक बेरोजगार होण्याचे संकेत

मुंबई : जगभरात महागाई शिगेला पोहोचली आहे. केवळ भारतातच नाही तर जगभरातील लोक महागाईने हैराण झाले आहेत. जगातील १०० हून अधिक देशांमध्ये महागाईचा दर भारतापेक्षा जास्त आहे. हे रोखण्यासाठी मध्यवर्ती बँका व्याजदर वाढवत आहेत. प्रत्येक दिवसागणिक मंदीची चिन्हे बळकट होत आहेत. एका सर्वेक्षणानुसार, जगभरातील ८६ टक्के सीईओंचे म्हणणे आहे की, पुढील १२ महिन्यांत मंदी येऊ शकते. यासोबतच कंपन्यांनीही मंदीचा सामना करण्यासाठी उपाययोजना करण्यास सुरुवात केली आहे. येत्या सहा महिन्यांत हजारो लोकांना नोकऱ्या गमवाव्या लागण्याची भीती आहे.

नोकर कपात

KMPG २०२२ CEO Outlook नुसार ४६ टक्के सीईओंनी पुढील सहा महिन्यांत नोकर कपात करण्याची योजना आखली आहे. त्याचप्रमाणे ३९ टक्के सीईओंनी सांगितले की त्यांनी आधीच नवीन नियुक्त्या थांबवल्या आहेत. हे सर्वेक्षण १२ जुलै ते २४ ऑगस्ट दरम्यान जगभरातील १,३२५ सीईओंमध्ये करण्यात आले. यापैकी ८६ टक्के लोकांचा असा विश्वास आहे की मंदी येत्या १२ महिन्यांत दार ठोठावणार आहे. ७५ टक्के लोकांनी म्हटले की मंदी आली तर कोविडमधून सावरणाऱ्या जागतिक अर्थव्यवस्थेच्या अडचणी वाढतील.

मंदीची तयारी

मंदीचा सामना करण्यासाठी त्यांनी तयारी सुरू केल्याचे सीईओचे म्हणणे आहे. सर्वेक्षणात सहभागी झालेल्या ७५ टक्के सीईओंनी सांगितले की, त्यांनी नोकरभरती थांबवली आहे. ८० टक्के सीईओंनी सांगितले की, त्यांनी नोकर कपात करण्याची योजना योजना आखली आहे. सर्वेक्षण केलेल्या सीईओंपैकी ५८ टक्के लोक म्हणाले की मंदी सौम्य असेल आणि त्याचा अल्पकालीन परिणाम होईल.

तथापि, बहुतेकांचे म्हणणे आहे की पुढील तीन वर्षांत जागतिक अर्थव्यवस्था पुन्हा रुळावर येऊ शकते. फेब्रुवारी २०२२ मध्ये झालेल्या शेवटच्या सर्वेक्षणात, सीईओंनी सायबरसुरक्षा हा सर्वात मोठा धोका असल्याचे म्हटले होते. परंतु नवीन सर्वेक्षणात उदयोन्मुख आणि व्यत्यय आणणारे तंत्रज्ञान विकासासाठी सर्वात मोठा धोका आहे. सर्वेक्षणानुसार, यापुढेही घरातून काम सुरू राहणार आहे. तीन वर्षांनंतर ६५ टक्के कर्मचारी कार्यालयातून तर सात टक्के कर्मचारी घरून काम करू शकतात.

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!