Just another WordPress site

मणी रत्नम यांच्या ‘पोन्नियिन सेल्वन’ने मोडला ‘बाहुबली २’ चा विक्रम, बॉक्स ऑफिसवर धुमाकळू, ‘इतके’ कोटी कमावले

कल्की कृष्णमूर्ती यांनी लिहिलेली ‘पोन्नियिन सेल्वन’ ही पाच भागांची कादंबरी तमिळनाडूमध्ये फार लोकप्रिय आहे. या कादंबरीमध्ये त्यांनी चोला साम्राज्याचा इतिहास रंजक पद्धतीने लिहिला आहे. सर्वप्रथम एम. जी. रामचंद्रन यांनी या कादंबरीवर आधारित चित्रपट तयार करण्याचा प्रयत्न केला. मणी रत्नम यांनी त्यांच्या कारकीर्दीच्या सुरुवातीला कमल हासन यांच्यासह हा चित्रपट बनवण्याचा निर्धार केला होता.

३० सप्टेंबर रोजी मणी रत्नम यांचा ‘पोन्नियिन सेल्वन’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला. या चित्रपटाची बॉक्स ऑफिसवरची यशस्वी घोडदौड सुरु आहे. प्रदर्शनानंतर पाचव्या दिवशी या चित्रपटाने २७.५ कोटी रुपयांचा गल्ला केला आहे. आतापर्यंत या चित्रपटाने १६५ कोटी रुपयांचे कलेक्शन केले आहे. वीकेंडनंतर लगेचच आलेल्या दसऱ्याच्या सुट्टीचा फायदा या चित्रपटाला होऊ शकतो अशी शक्यता वर्तवली जात आहे. पिंकव्हिलाच्या वृत्तानुसार, पोन्नियिन सेल्वनचे एका आठवड्याचे बॉक्स ऑफिस कलेक्शन २०५-२१० कोटी रुपये इतके होऊ शकते.

या चित्रपटाने शुक्रवारी ३० सप्टेंबर रोजी ३८.५० कोटी रुपये, शनिवारी ३५.५० कोटी रुपये, रविवारी ३९ कोटी रुपये, सोमवारी २५ कोटी रुपये आणि पाचव्या दिवशी मंगळवारी २७.५० कोटी रुपये इतकी कमाई केली आहे. तमिळनाडूमध्ये हा चित्रपट पहिल्या आठवड्यात ‘सरकार’ आणि ‘बिगील’ या चित्रपटांचा रेकॉर्ड मोडणार आहे असे म्हटले जात आहे. तमिळनाडूमध्ये प्रदर्शित या ब्लॅकबास्टर चित्रपटाने पाचव्या दिवशी १०० कोटींचा पल्ला गाठत ‘बाहुबली २’ चा विक्रम मोडला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!