Just another WordPress site

क्रेडिट आणि डेबिट कार्डमध्ये नेमका फरक काय? कोणत्या कार्ड्सचा वापर कुठं होतो?

एटीएम, डेबिड, क्रेडिड कार्ड सगळ्यांनी पाहिलं असेल. तुमच्यापैकी अनेकजण ते वापरत देखीस असतील. खरतंर हे तिन्ही कार्ड दिसायला अगदी सारखेच असतात. मात्र तरीही या तिन्ही कार्डवर मिळणाऱ्या सुविधा वेगवेगळ्या असतात. या कार्डांमुळं, पैसे काढण्यापासून खरेदी करणं खूप सोपं होतं. मात्र क्रेडिट कार्डचं काम डेबिड कार्ड करु शकत नाही आणि डेबिट कार्डचं काम क्रेडिट कार्ड करु शकत नाही. या कार्ड्समधील फरक नेमका काय? याच विषयी जाणून घेऊ.

आजकाल अनेक आर्थिक व्यवहार हे कार्डच्या माध्यमातून केले जातात. कार्डद्वारे पेमेंट करण्यात होणाऱ्या सुलभतेमुळं त्याचा प्रसार देखील खूप वाढला. यामुळेच बँकाकडूनही ग्राहकांना एटीएम कार्ड, डेबिट कार्ड आणि क्रेडिट कार्ड सारख्या सुविधा पुरवल्या जातात. या कार्डांमुळे, पैसे काढणे तसेच खरेदी करणेही खूप सोपे होते. मात्र अजूनही अशी अजूनही अनेक लोकं आहेत जे एटीएम कार्ड, डेबिट आणि क्रेडिट कार्ड हे एकसारखेच असल्याचा विचार करतात. मात्र प्रत्यक्षात त्या प्रत्येकाचे काम वेगवेगळे असते.

काय असते एटीएम कार्ड?

एटीएम कार्डचा वापर केवळ हा एटीएम मशीनमध्ये पैसे काढण्यासाठी केला जातो. एटीएम कार्ड हे आपले करंट अकाउंट किंवा बँकेच्या बचत खात्याशी जोडले गेलेले असते. ते फक्त एटीएम मशिनमध्येच वापरता येते. त्याद्वारे बँकेच्या ग्राहकांना कर्ज दिलं जात नाही. तसंच जर जवळपास एटीएम मशीन नसेल तर पैसे काढण्यासाठी एटीएमचा वापर करता येणार नाही.

डेबिट कार्ड

डेबिट कार्ड हे तुमच्या बचत किंवा चालू बँक खात्याशी जोडलेलं असतं. डेबिट कार्ड हे देखील एटीएम कार्डप्रमाणेच दिसत असतं. मात्र, या कार्डच्या वरच्या बाजूला मास्टर कार्ड, व्हिझा कार्ड तसंच रूपे कार्ड असे लिहिलेलं असतं. जे एटीएम कार्डमध्ये कुठंही लिहिलेलं दिसत नाही. तुमच्या डेबिट कार्डमधून रक्कम आपोआप आणि त्वरित जमा केली जाते किंवा वजा केली जाते. डेबिट कार्ड हे दोन गोष्टी करते. म्हणजे, डेबिट कार्डचा वापर आपण एटीएम कार्डप्रमाणे एटीएम मशिनमधुन पैसे काढण्यासाठी करू शकतो. शिवाय, डेबिट कार्डचा वापर करून आपण कुठलेही आँनलाईन पेमेंट करू शकतो. यामध्ये ग्राहकांना क्रेडिट कार्डप्रमाणे व्याज द्यावे लागत नाही. महत्वाचं म्हणजे, डेबिट कार्डचा वापर आपण स्वाईप मशिनद्वारे आँनलाईन पेमेंट करण्यासाठी देखील करू शकतो. डेबिट कार्ड हे आपल्या बँक अकाऊंटशी लिंक असते म्हणुन आपण आपल्या डेबिट कार्डद्वारे पैसे तेव्हाच काढु शकतो, जेव्हा आपल्या बँक खात्यात तेवढी रक्कम शिल्लक असेल. डेबिट कार्डद्वारे आपण आँनलाईन मोबाईलचा रिचार्ज करू शकतो. तसेच वीज बील देखील भरू शकतो. डेबिल कार्डचा वापर करून आपण भारतामध्येच आँनलाईन ट्रान्झँक्शनचे व्यवहार करू शकतो.

क्रेडिट कार्ड

क्रेडिट कार्ड हा आणखी एक प्रकारचा कार्ड आहे. या कार्डच्या माध्यमातून तुम्ही बँक किंवा वित्तीय संस्थेकडून पैसे घेऊ शकता. या कार्डचा वापर करण्यासाठी तुमच्या बँकेत पैसे असणं गरजेचं नसतं. तुम्ही आधी बँकेकडून उसने पैसे घेऊन त्याचा वापर करु शकता. मात्र, क्रेडिट कार्डची देखील एक लिमिट ठरलेली असते. त्या लिमिटनुसार आपल्याला क्रेडिट लोन दिले जात असते.
थोडक्यात काय तर तुमच्या खात्यात पैसे नसतानाही क्रेडिट कार्ड वापरून खरेदी, ऑनलाइन पेमेंट आणि इतर खर्च करता येतात. मात्र, यावर व्याज भरावे लागते. आणि तुम्हाला देय तारखेपर्यंत त्या अकाउंटमध्ये पैसे भरावे लागतात. जर आपण क्रेडिट कार्ड कर्जाची परतफेड करण्यास सक्षम नसल्यास, बँक घेतलेल्या पैशावर व्याज दर आकारते. महत्वाचं म्हणजे, बँक सर्व ग्राहकांना क्रेडिट कार्ड सुविधा देत नाही. आणि एटीएममधून पैसे काढण्यासाठी क्रेडिट कार्ड वापरता येत नाही, कारण ते बँक खात्याशी जोडलेले नसते. दुसरं म्हणजे, ऑनलाइन पेमेंटसह, ज्या ठिकाणी रुपे, मास्टर आणि व्हिसा कार्ड स्वीकारले जातात त्या ठिकाणी देखील याचा वापर केला जाऊ शकतो.

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!