Just another WordPress site

उर्फी जावेदच्या अडणणीत वाढ, उर्फीला दुबई पोलिसांनी घेतले ताब्यात, बोल्ड कपडे परिधान केल्याचा आरोप

मुंबई : बिग बॉस ओटीटी फेम उर्फी जावेद तिच्या ऑफबीट ड्रेसिंग सेन्समुळे चर्चेत कायम चर्चेत असते. भारतात ती नेहमीच रंगीबेरंगी आणि चित्रविचित्र फॅशनचे कपडे घालून रस्त्यावर फिरते. ती कधी कोणती फॅशन करेल हे सांगता येत नाही. वायर, मोबाईल, सिम कार्ड, दगड अशा कोणत्याही वस्तूंचा वापर करून बनवलेले कपडे उर्फी परिधान करते. उर्फीला यासाठी अनेकदा ट्रोलही करण्यात आलंय. मात्र, उर्फीला याचा काही फरक पडत नाही. मात्र हेच बोल्ड कपडे घालणे तिच्यासाठी आता अडचणीचे ठरलेय. उर्फी जावेद हिला दुबईत बोल्ड कपडे परिधान केल्याप्रकरणी ताब्यात घेण्यात आलंय.

मिळालेल्या माहितीनुसार, उर्फी जावेद नुकतीच तिच्या एका शूटसाठी दुबईला गेली आहे. दुबईत शूटिंग सुरू असताना उर्फीची तब्येत बिघडल्याचे सांगण्यात येतंय. पण उर्फीला यातही शांत बसवेना. तिनं दुबईतही तिची फॅशन दाखवण्याचा प्रयत्न केला. इथं तिने नेहमीप्रमाणे बोल्ड कपडे परिधान करत काही व्हिडीओ शूट केले, पण तिथल्या लोकांना ते रुचलं नाही आणि त्यांनी पोलिसांत तक्रार दिली. त्यानंतर स्थानिक पोलिसांनी तिला ताब्यात घेतलं. उर्फी जावेदने इंस्टाग्रामवर पोस्ट करण्यासाठी स्वत: तयार केलेल्या कपड्यामंअध्ये एक व्हिडिओ रेकॉर्ड केला. हा व्हिडिओ सार्वजनिक करण्यात आला. तिने ज्या ठिकाणी हे कपडे घातले होते त्या जागेवर तिने परिधान केलेले कपडे घालण्याची परवानगी नाही. त्यामुळे दुबई पोलिसांनी तिला ताब्यात घेतलंय. पोलीस उर्फी जावेदची चौकशी करत असून तिच्यावर पुढे काय कारवाई होते हे पाहणे महत्वाचे आहे.

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!