Just another WordPress site

पतंजलीच्या ऑनलाईन मीटिंगमध्ये देश-विदेशातील अनेक जण उपस्थित, पुण्यातून पॉर्न व्हिडीओ सुरू झाला अन्…

पुणे: ऑनलाईन मीटिंगमध्ये बरेच गोंधळ होतात. कधी कोणाचा फोन वाजतो, कधी कोणाच्या लॅपटॉपवर गाणं सुरू होतं. मात्र एका व्यक्तीनं ऑनलाईन मीटिंगमध्ये यापेक्षा भयंकर कारनामा केला. मीटिंग सुरू असताना एका व्यक्तीनं पॉर्न व्हिडीओ सुरू केला. झूमवर मीटिंग सुरू असताना एकानं पॉर्न मुव्ही सुरू केली.

पतंजली योगपीठशी संबंधित असलेल्या आरोग्य संशोधन केंद्रात एक ऑनलाईन बैठक सुरू होती. बैठकीला देश-विदेशातील अनेक जण उपस्थित होते. तेव्हा पुण्यातून मीटिंगमध्ये सहभागी झालेल्या एका तरुणानं पॉर्न व्हिडीओ सुरू केला. तरुणानं हा प्रकार जाणूनबुजून केला की त्याच्या हातून चुकून घडला हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. पण मीटिंगमध्ये पॉर्न व्हिडीओ सुरू झाला इतकी बाब स्पष्ट आहे.

या प्रकरणी हरिद्वारच्या बहादराबाद पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. पतंजलीशी संबंधित कमल भदौरिया आणि शिवम वालिया यांनी तक्रार नोंदवली. हरिद्वार पोलिसांनी माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या अंतर्गत गुन्हा नोंदवला. या प्रकरणाचा तपास सुरू आहे.

पतंजलीकडून एक तक्रार नोंदवण्यात आल्याची माहिती एसएसपी अजय सिंह यांनी दिली. पतंजली योगपीठाशी संबंधित असलेल्या अनेकांची बैठक सुरू होती. देश-विदेशातील अनेक जण महत्त्वपूर्ण विषयांवर ऑनलाईन चर्चा करत होते. महिलादेखील मीटिंगमध्ये होत्या. त्यादरम्यान एका तरुणानं अश्लिल व्हिडीओ सुरू केला, असं सिंह यांनी सांगितलं.

पुण्याच्या येरवडा येथे असलेल्या एका कॉलेज कॅम्पसमध्ये राहणाऱ्या आकाश नावाच्या तरुणाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली. आयटी कायद्याच्या अंतर्गत पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. प्रकरणाचा तपास करून कारवाई करण्याचं आश्वासन पोलिसांनी दिलं आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!