Just another WordPress site

पाणी प्रश्न पेटला! नागरिकांनो, पाणी जरा जपून वापरा; आजपासून ‘या’ तारखेपर्यंत होणार पाणीकपात

मुंबई : मुंबई महानगरपालिकेने पाणीपुरवठ्यामध्ये १० टक्के पाणी कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे मुंबईकरांनी पाण्याचा जपून वापर करावा अशा सूचना देण्यात आल्या आहेत. मुंबईतील न्यूमॅटिक गेट सिस्टममधील एअर ब्लॅडर खराब झाल्यामुळे हा निर्णय घेण्यात आल्याची प्राथमिक माहिती आहे.

हे ब्लॅडर बदलण्याचं काम मंगळवारी एक नोव्हेंबर ते गुरुवारी १० नोव्हेंबरपर्यंत हाती घेणार असल्याची माहिती आहे. या दुरुस्तीच्या कामावेळी ठाणे व भिवंडी महानगरपालिकेत पाणीपुरवठ्यावर परिणाम होणार आहे. काम लवकरात लवकर पूर्ण करण्याचे शर्तीचे प्रयत्न करण्यात येतील. मात्र, या दरम्यान पाणीपुरवठा खंडित झाल्यास किंवा पाणी कपात झाल्यास नागरिकांनी काळजी घ्यावी अशा सूचना देण्यात आल्या आहेत.

या काळामध्ये बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने नागरिकांना विनंती करण्यात आली आहे. पाण्याचा काटकसरीने वापर केला पाहिजे, शक्यतो गरज असल्यास पाण्याचा वापर टाळा. कारण दिनांक १ नोव्हेंबर ते १० नोव्हेंबर या कालावधीमध्ये पाण्याचा आवश्यक तो साठा करून ठेवावा असं आवाहन नागरिकांना करण्यात आलं आहे. या काळात कोणालाही पाण्याची अडचण होऊ नये यामुळे यामुळे ही अधिसूचना महानगरपालिकेकडून देण्यात आली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!