Just another WordPress site

नवा महिना नवे नियम; आजपासून बदलले ‘हे’ महत्वाचे नियम, तुम्हाला बसणार मोठा आर्थिक फटका

मुंबई : आजपासून नोव्हेंबर महिना सुरू झाला आहे. १ नोव्हेंबरपासून नियमांमध्ये अनेक महत्त्वाचे बदल होणार आहेत, ज्याचा थेट परिणाम सर्वसामान्यांवर थेट परिणाम होणार आहेत. त्यामुळे आज बदलत असलेल्या नियमांची माहिती घेणे गरजेचे आहे, जेणेकरून तुम्हाला कोणत्याही अडचणींचा सामना करावा लागणार नाही. यापैकी काही बदल पैशाशी संबंधित असल्यामुळे त्यांचा थेट परिणाम तुमच्या खिशावर होणार आहे. त्यामुळे तुम्ही हे नवीन नियम ध्यानात ठेवले पाहिजेत नाही तर महागात पडू शकते.

विमा दाव्यांसाठी KYC अनिवार्य

१ नोव्हेंबरपासून विमा पॉलिसींसाठी केवायसी अनिवार्य असेल. यापूर्वी एक निवेदन जाहीर करताना भारतीय विमा नियामक आणि विकास प्राधिकरण (IRDAI) ने सांगितले की १ नोव्हेंबर २०२२ पासून आरोग्य आणि सामान्य विम्यासाठी KYC पडताळणी अनिवार्य होईल. सध्या, केवायसी पडताळणी ऐच्छिक आहे. “या संदर्भात अंतिम मुदत पुढे वाढवली जाणार नाही”, असेही त्यात नमूद करण्यात आले आहे.

एलपीजी सिलिंडर

एलपीजी सिलेंडर बुक केल्यानंतर तुमच्या नोंदणीकृत मोबाईलवर OTP पाठवला जातील, जो तुम्हाला गॅस डिलिव्हरीच्या वेळी सांगावा लागेल, तरच तुम्हाला सिलिंडर दिला जाईल. कोणत्याही प्रकारची फसवणूक होऊ नये यासाठी सरकारने हे पाऊल उचलले आहे. याशिवाय, दिवाळीनंतर एलपीजी सिलिंडरच्या दरात मोठी कपात करण्यात आली आहे. आज म्हणजेच १ नोव्हेंबरपासून व्यावसायिक गॅस सिलेंडर ११५ रुपयांनी स्वस्त झाला आहे. मात्र, ६ जुलैपासून घरगुती सिलिंडरच्या दरात कोणताही बदल झालेला नाही.

पीएम किसान योजनेचे नियम बदलले

पीएम किसान योजनेच्या १२व्या हप्त्याचे पैसे पाठवण्यापूर्वी मोठा बदल करण्यात आला आहे. आता लाभार्थी शेतकरी पोर्टलवर जाऊन आधार क्रमांकावरून त्यांची स्थिती तपासू शकणार नाहीत आणि त्यासाठी त्यांना आता नोंदणीकृत मोबाईल क्रमांक द्यावा लागणार आहे. यापूर्वी मोबाइल किंवा आधार क्रमांकावरून लाभार्थी स्थिती जाणून घेत होते.

जीएसटी रिटर्नमध्ये द्यावा लागणार कोड

जीएसटी रिटर्नच्या प्रक्रियामध्येही बदल करण्यात आले आहेत. आता ५ कोटी रुपयांपेक्षा कमी उलाढाल असलेल्या करदात्यांना जीएसटी रिटर्नमध्ये चार अंकी HSN कोड टाकणे बंधनकारक असेल. यापूर्वी दोन अंकी HSN कोड टाकावा लागत होता. याआधी, पाच कोटींपेक्षा जास्त उलाढाल असलेल्या करदात्यांना १ एप्रिलपासून चार अंकी कोड आणि १ ऑगस्टपासून सहा अंकी कोड टाकणे बंधनकारक करण्यात आले होते.

पाळीव प्राण्यांना विमानात एन्ट्री

अकासा एअरने नोव्हेंबरपासून पाळीव प्राण्यांनाही विमानात घेऊन जाण्यासाठी हिरवा कंदील दाखवला आहे. यासोबतच कंपनी नोव्हेंबरपासून कार्गो सेवाही सुरू करणार आहे.

मुंबईत गाडीच्या मागे सीट-बेल्ट अनिवार्य

गाडीमधून प्रवास करणाऱ्या सर्व प्रवाशांना आजपासून म्हणजे १ नोव्हेंबर २०२२ पासून सीट बेल्ट लावणे अनिवार्य आहे. १४ ऑक्टोबर रोजी मुंबई पोलिसांनी अधिसूचना जारी केली होती की १ नोव्हेंबर, २०२२ पासून चालक आणि सहप्रवाशांना सीट बेल्ट घालणे अनिवार्य असेल. केंद्रीय रस्ते, वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने मसुदा नियम जारी केला होता, ज्यामध्ये कार निर्मात्यांना कारच्या सर्व सीटवर सीट बेल्ट अलार्म लावणे करणे बंधनकारक होते.

आजपासून आरबीआयचा डिजिटल रुपी

भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) मंगळवारी म्हणजेच आज, केंद्रीय बँक डिजिटल चलन (CBDC) किंवा ई-रुपी साठी पहिला पथदर्शी प्रकल्प लाँच करणार आहे. पायलट प्रोजेक्ट सरकारी सिक्युरिटीजसाठी दुय्यम बाजार व्यवहारांच्या सेटलमेंटवर लक्ष केंद्रित करेल.

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!