Just another WordPress site

वडिलांचा कहर! लेकीला खेकड्याने चावा घेतल्याने बापाने तोच जिवंत खेकडा खाल्ला

चीनः मुलीला खेकड्याने चावा घेतल्यावर संतापलेल्या वडिलांनी कहरच केला. तो जिवंत खेकडाच तिच्या वडिलांना थेट खाल्ला आहे. जिवंत खेकडा खाल्ल्याने त्यांची स्थिती गंभीर असून त्यांना आता रुग्णालयाच्या खेपा माराव्या लागत आहेत.

चीनमध्ये ही घटना घडली आहे. साउथ चायना मॉर्निंग पोस्टने दिलेल्या वृत्तानुसार चीनमधील पूर्वेकडील तटील प्रांतात राहणाऱ्या ३९ वर्षीय के लू यांने जिवंत खेकडा खाल्ल्यानंतर दोन महिन्याने त्याला त्रास जाणवू लागला. या घटनेच्या दोन महिन्यानंतर त्याच्या पाठित दुखू लागले. त्यानंतर त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले.

लू याचे वैद्यकीय अहवाल तपासल्यानंतर त्याच्या छाती, पोट आणि लिव्हर आणि पचनसंस्थेत बदल झाल्याचे नमूद केले होते. मात्र, असे का घडले याचे कारण मात्र सापडत नव्हते. डॉक्टरांनी कित्येकदा त्यांना याबाबत विचारलं होतं. तुम्ही काही चुकीचं खाल्लं होतं का ज्यामुळं तुम्हाला अॅलर्जी होईल, असं डॉक्टरांनी विचारलं होतं. मात्र, त्यावर तो प्रत्येकवेळी नाहीच म्हणत होता.

मात्र, लू यांच्या पत्नीने त्याने जिवंत खेकडा खाल्ला असल्याचं डॉक्टरांना सांगितलं. त्यावर डॉक्टरांनी त्याला यामागचं कारणं विचारलं. लूने दिलेले कारण ऐकून डॉक्टरही काहीवेळासाठी हैराण झाले होते. मुलीला खेकडा चावल्याने मी बदला घेण्यासाठी जिवंत खेकडा खाल्ला, असं त्यानं म्हटलं होतं.

एक छोटी नदी पार करत असताना लूच्या मुलीला खेकड्याने चावा घेतला. त्यामुळं राग आल्याने कच्चा खेकडा खाल्ला, असं त्याने कबुल केलं आहे. त्यानंतर लूची ब्लड टेस्ट केल्यानंतर त्याना तीन पैरासिटिक इन्फेक्शन झाल्याचं निदान झालं. कच्च मांस खाल्याने हा आजार होतो. आता त्याच्या प्रकृतीत सुधारत आहे. मात्र, डॉक्टरांनी त्याला कच्च मांस किंवा जिवंत खेकडा न खाण्यास बजावलं आहे.

चीनमध्ये खेकडा खाणं ही खूप सामान्य बाब आहे. साधारणतः लोकं खेकडा शिजवून किंवा मॅरीनेटकरुन खातात. काही ठिकाणी drunken Crabs नावाचा पदार्थही खाल्ला जातो. यामध्ये खेकडा दारूसोबत मॅरीनेट केला जातो आणि मसाल्यासोबत खाल्ला जातो. मॅरिनेट केलेला खेकडा खाणं एकवेळ चांगलं आहे. कारण दारुमुळं खेकड्यात असलेले पॅरासाइट मारले जातात. मात्र तरीही ही पद्धत १०० टक्के सुरक्षित नाहीये.

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!