Just another WordPress site

उसतोड मजुराच्या लहान मुलावर कुत्र्याचा हल्ला, दोन वर्षाच्या मुलाचे लचके तोडले

बारामती : उसतोड करणाऱ्या मजुराच्या लहान मुलावर कुत्र्याने हल्ला केल्याने दोन वर्षाचा मुलगा गंभीर जखमी झाला आहे. बारामती तालुक्यातील कोराळे येथे ऊस तोडणी करायला गेलेल्या मजुराच्या लहान मुलावर कुत्र्याने हल्ला केला. कुत्र्याने त्या लहान मुलाच्या तोंडाच्या पूर्णपणे चिंधड्या केल्या होत्या. दरम्यान त्या मुलावर उपचार करण्यासाठी बारामती येथील रुग्णालया दाखल करण्यात आले होते. बारामतीच्या डॉक्टरांनी या मुलावर यशस्वी शास्त्रक्रिया करून मुलाचे प्राण वाचवले आहेत.

सोमेश्वर सहकारी कारखान्याच्या कार्यक्षेत्रात ऊस तोडणी करायला गेलेल्या दोन वर्षाच्या युवराज राठोड या चिमुकल्यावर कुत्र्याने जीवघेणा हल्ला केला. या हल्ल्यामध्ये गंभीर जखमी झालेल्या या मुलाला बारामती शहरातील श्रीपाल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. हॉस्पिटलमधील डॉक्टर राजेंद्र मुथा, डॉक्टर सौरभ मुथा, डॉक्टर आशुतोष आटोळे यांनी तब्बल दोन तास शस्त्रक्रिया करून मुलाचे प्राण वाचवले आहेत. या मुलाच्या शरीरावर ५५ टाके टाकण्यात आले आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!