Just another WordPress site

‘मी शाहरुखला ओळखत नाही’; सीएम बिस्वा यांचं वक्तव्य, शाहरुख खाने रात्री २ वाजताच केला फोन, म्हणाला,…

बॉलीवूड अभिनेता शाहरुख खानचा ‘पठान’ हा चित्रपट प्रदर्शित होण्यासाठी सज्ज झालाय. येत्या २५ जानेवारी रोजी हा चित्रपट संपूर्ण देशभरात प्रदर्शित होणार आहे. पठान चित्रपटाने चागलाचं दंगा केलाय. मग बिकिनी वाद असो किंवा त्याचा रंग. मात्र या चित्रपटावरून सुरू असलेला वाद अद्यापही शमलेला नाही. गुवाहाटीमधील थिएटरबाहेर ‘पठान’ विरोधात निदर्शनं करण्यात आली. यावेळी शाहरुखचे पोस्टरही जाळण्यात आले. याविषयी आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्वा सरमा यांना विचारलं असता त्यांनी अजब आणि तिरकस प्रतिक्रिया दिली होती.

२०२३ मधील सर्वात मोठा चित्रपट पठान तीन दिवसांनी थिएटरमध्ये दाखल होणार आहे. बॉलीवूडचा मेगास्टार शाहरुख खान हा त्याच्या पठान या चित्रपटामुळे सध्या चांगलाच चर्चेत आहे. हिदुत्ववादी संघटनांसह वेगवेगळ्या स्तरातून पठानला बॉयकॉट करायची मागणी होतेय. चित्रपटातील गाणी आणि त्यातील अश्लीलता यामुळे ‘पठान’ चांगलाच वादाच्या भोवऱ्यात अडकला. गुजरातसह कर्नाटकात बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी पठाण चित्रपट प्रदर्शित होऊ न देण्याची धमकी दिलीये. मात्र, शाहरुख खान तब्बल चार वर्षांनंतर पठानच्या माध्यमातून मोठ्या पडद्यावर कमबॅक करतोय. त्यामुळे त्याच्या चाहत्यांसाठी हा दिवस एखाद्या सणापेक्षा कमी नाही. शाहरुखचे चाहते ‘पठान’ या सिनेमाची आतुरतेने वाट पाहताहेत. काही दिवसांपूर्वी या चित्रपटाच्या अॅडव्हान्स बुकिंगला परदेशात सुरुवात झाली होती. परदेशातील अनेक प्रेक्षक चित्रपटाच्या अॅडव्हान्स बुकिंगला उत्तम प्रतिसाद देताहेत. शिवाय भारतामध्ये देखील प्रेक्षक अॅडव्हान्स बुकिंगला उत्तम प्रतिसाद मिळतोय. मात्र चित्रपटाच्या प्रदर्शनापूर्वी देशभरात वाद सुरू आहे.
शुक्रवारी बजरंग दलाच्या काही लोकांनी आसाम मधील नारेंगी येथील चित्रपटगृहाबाहेर चित्रपटाबाबत घोषणाबाजी केली. यासोबतच चित्रपटाचे पोस्टरही जाळण्यात आले. या वादानंतर शनिवारी झालेल्या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांना काही पत्रकारांनी बजरंग दलाने ‘पठाण’वर केलेल्या गदारोळाबद्दल विचारले. यावेळी त्यांनी मोठं वक्तव्य केलं होतं. पत्रकार परिषदेमध्ये बोलतांना त्यांनी ‘कोण शाहरुख खान? मी नाही ओळखत. मला त्याच्याविषयी आणि त्याच्या ‘पठाण’ या चित्रपटाविषयी काहीही माहीत नाही’, असं सांगितलं. मुख्यमंत्र्यांचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. तसेच या व्हिडीओवर अनेकजण कमेंट करत आहेत.

याशिवाय शाहरुख खानने आपल्याला फोन केला नसल्याचंही त्यांनी सांगितलं. त्याने फोन केल्यास प्रकरण गांभीर्याने घेत कारवाई केली जाईल. फोन केल्यास गुन्हाही नोंदवला जाईल, असंही त्यांनी सांगितले होतं. त्यांचे हे उत्तर सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झालं असून नेटकऱ्यांनी त्यांच्या वक्तव्यावर नाराजी व्यक्त केलीये. शाहरुखच्या चाहत्यांनी मुख्यमंत्र्याना त्यांनी केलेल्या वक्तव्यामुळं चांगलचं ट्रोल केलं. ‘पठाण’ मधील ‘बेशरम रंग’ या गाण्यात दीपिका पदुकोण भगव्या बिकिनीमध्ये दाखवल्याबद्दल प्रतिक्रिया येत आहेत. अलीकडे देशातील शहरांमध्ये पठाणांच्या विरोधात निदर्शने होत आहेत. विश्व हिंदू परिषदेसह अनेक नेत्यांनी चित्रपटावर बंदी घालण्याची मागणी केलीये. मात्र, आता भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत पंतप्रधान मोदी यांनी भाजप नेत्यांना फटकारल्यानंतर आता अनेक वाचाळ नेत्यांनी शाहरुखच्या चित्रपटावर सावध प्रतिक्रिया द्यायला सुरुवात केली. दरम्यान, आता पुन्हा हिमंत सरमांनी शाहरुख बद्दल एक ट्विट केलंय.

बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी गुवाहाटीत पठाण चित्रपटाचे पोस्टर्स जाळल्यानंतर बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान याने मध्यरात्री दोन वाजता फोन करून प्रकरणाबद्दल नाराजी व्यक्त केल्याचा खुलासा खुद्द मुख्यमंत्री हिमत बिस्वा सरमा यांनी केला. त्यांनी लिहिलं ट्वीट करत सांगितलं की, “बॉलिवुड अभिनेते शाहरुख खान यांनी मला रात्री दोन वाजता फोन केला. यावेळी आमच्यात फोनवरून चर्चा झाली. गुवाहाटी येथे त्यांच्या चित्रपटाच्या प्रदर्शनादरम्यान झालेल्या घटनेबद्दल त्यांनी दु:ख व्यक्त केलं. कायदा आणि सुव्यवस्था राखण्याचे काम राज्य सरकारचे असल्याचे म्हणत मी त्यांना आश्वासित केलं. आम्ही याबाबत चौकशी करू तसेच आगामी काळात अशा घटना घडणार नाहीत, याची खबरदारी घेऊ”, अशा आशयाचं ट्विट सीएम सरमा यांनी केलं. महत्वाची बाब अशी की एका दिवसापूर्वी ‘पठाण’च्या निषेधाबाबत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना हिमंम सरमा यांनी चक्क कोण शाहरुख खान? असं विधान केलं होतं. आता शाहरुखनंच फोन केल्याची माहिती देत सरमा यांनी सर्वांना सुखद धक्का दिला. त्यामुळं आता भाजप नेत्यांकडून पठाणला होणारा विरोध मावळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

दरम्यान, पठाण चित्रपटात शाहरुख खानसह दीपिका पदुकोण आणि जॉन अब्राहम हे देखील मुख्य भूमिकेत आहेत. हा चित्रपट २५ जानेवारीला प्रदर्शित होत आहे. चित्रपटातील बेशरम रंग या गाण्यावरून बराच वाद झाला होता आणि तो अजूनही सुरूच आहे. पठाणांवर बहिष्कार टाकण्याचा ट्रेंडही सुरू आहे. आता वादाच्या भोवऱ्यात रिलीज झाल्यानंतर पठाण बॉक्स ऑफिसवर किती धमाल करतो हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!