Just another WordPress site

जया बच्चन यांचे ‘ते’ कृत्य पाहून उर्फी जावेदने केली कानउघाडणी; म्हणाली, “तुम्ही मोठ्या आहात म्हणून…”

एकेकाळी बॉलिवूड गाजवणारी आणि प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारी अभिनेत्री म्हणजे जया बच्चन. सध्या सोशल मीडियावर जया बच्चन यांचा एक व्हिडीओ व्हायरल झाला. या व्हिडीओमध्ये त्या फोटोग्राफरशी थोड्या उद्धट पद्धतीने बोलल्या. व्हिडीओमध्ये त्या काही फोटोग्राफर्सवर भडकलेल्या दिसताहेत. आता जया बच्चन यांचा हा व्हायरल व्हिडीओ शेअर करुन अभिनेत्री उर्फी जावेदनं जया बच्चन यांच्यावर जोरदार टीका केली.

महत्वाच्या बाबी

१. फोटोग्राफरवर संतापल्या अभिनेत्री जया बच्चन
२. फोटोग्राफरशी उद्धट पद्धतीने बोलल्या जया
३. व्हिडीओवर नेटकऱ्यांनी केलाय संताप व्यक्त
४. जया यांचे कृत्य पाहून उर्फी जावेदही भडकली

 

जया बच्चन या कायमच आपल्या तापट स्वभावामुळे आजकाल प्रसिद्ध आहेत. सोशल मीडियावर अनेक चाहतेही त्यांच्या या स्वभावावर कायमच नाराज असतात. इंटरनेटवर त्यांना नेहमीच ट्रोल केलं जात. मीडियाशी उध्दटपणे बोलण्यावरून त्या कायमच ट्रोल होत आल्या.आताही जया बच्चन यांचा विमानतळावरील एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. ज्यात जया बच्चन आणि त्यांची नात नव्या नवेली नंदा एअरपोर्टवर जाताना दिसत होत्या. त्यावेळी काही फोटोग्राफर्सनी त्यांचे फोटो काढण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी लगेच जया बच्चन त्यांच्याकडे बोट दाखवून ‘तुम्ही कोण आहात?’ त्यावर फोटोग्राफर काही उत्तर देण्याआधीच ‘कोणत्या मीडियामधून आहाता?’ असा जया बच्चन दुसरा प्रश्न विचारतात. त्यावर फोटोग्राफर्सने काही नावे घेतली. त्यानंतर त्या आणखी एक प्रश्न विचारतात की ‘हा कोणता पेपर आहे?’ जया बच्चन यांना संतापलेले पाहून नात नव्या नवेली नंदा त्यांना शांत करण्याचा प्रयत्न करते. त्याचेवळी एका फोटोग्राफरला ठेच लागून पडता पडता वाचला. यावर जया बच्चन यांनी त्याला ‘तो ठीक आहे की नाही’ हे विचारण्याऐवजी ‘जे झालं ते बरं झालं’ असं त्या म्हणाल्या. ‘तो पुन्हा पडायला हवा..’ असंही त्या म्हणाल्या. या व्हिडीओमध्ये त्या फोटोग्राफरशी थोड्या उद्धट पद्धतीने बोलल्या पाहून त्यांच्या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केला होता. त्यानंतर आता उर्फी जावेदनंही या व्हिडीओवर संताप व्यक्त केला.
उर्फी जावेदनं तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर जया बच्चन यांचा व्हिडीओ शेअर करत चांगलीच कानउघाडणी केली. हा व्हिडीओ शेअर करत तिने दिलेल्या कॅप्शनने सर्वांचे लक्ष वेधले. उर्फीनं कॅप्शनमध्ये लिहिलं, त्यांनी खरंच म्हटलं का की तू पुन्हा पडायला हवा. मग कृपया तुम्ही कोणीच त्यांच्यासारखे होऊ नका. सगळ्यांची प्रगती व्हावी, असा विचार करावा. जे कॅमेऱ्याच्या मागे लोक आहेत आणि जे पुढे आहेत त्या सर्वांची प्रगती व्हावी, असं उर्फी म्हणाली. पुढे ती म्हणाली, “तुम्ही मोठ्या आहात म्हणून लोक तुमचा आदर करत नाहीत किंवा त्यांच्यापेक्षा जास्त शक्तीशाली आहात म्हणून लोक तुम्हाला मान देत नाहीत. तर तुम्ही त्यांच्याशी कसे वागता किंवा किती चांगले वागता यावरून लोक तुमचा आदर करतात.”या स्टोरी मधून उर्फीने जया बच्चन यांच्या वर्तनावर चांगलीच नाराजी व्यक्त केली आहे.
याशिवाय उर्फीने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर आणखी एक नोट शेअर केली. तिने लिहिलं की, ‘मला माझे विचार मांडायला आवडत नाही. पण कधीकधी मी स्वतःवर संयम ठेवू शकत नाही. अर्थात मला माहीत आहे की मी जे करतेय त्याने मला कामाच्या संधीही गमवाव्या लागतील. पण गप्प राहणं आता शक्य नाही.
अॅक्टिंग, मॉडेलिंग आणि जाहिरातींमध्ये उर्फी काम करते. तिच्या सोशल मीडियावरील पोस्टला देखील नेटकऱ्यांची पसंती मिळते.

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!