Just another WordPress site

उद्धव ठाकरेंनी दिलासा; समता पक्षाची याचिका हायकोर्टानं फेटाळली; आता मशाल ठाकरेंकडेच राहणार .

नवी दिल्ली : शिवसेना पक्षचिन्ह धनुष्यबाण गोठवल्यानंतर ठाकरे गटाला मशाल हे चिन्ह देण्यात आले होते. या चिन्हावर समता पक्षाने आक्षेप घेत उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. मात्र, दिल्ली हायकोर्टाने ठाकरे गटाला दिलासा दिला आहे.

निवडणूक आयोगाने शिवसेनेला दिलेल्या ‘धगधगती मशाला’ या चिन्हावर समता पक्षाने काही दिवसांपूर्वी दावा केला होता. त्यानंतर आता अंधेरी पोटनिवडणुकीत शिवसेनेला मशाल चिन्ह देऊ नये, अशी मागणी समता पक्षाने केली होती. त्याबाबत समता पक्षाकडून दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती.

या चिन्हावर आपला अधिकार आहे हे दाखवण्यात समता पक्ष यशस्वी होऊ न शकल्याने त्यांची याचिका फेटाळण्यात आल्याचे न्यायमूर्ती संजीव नरुला यांनी आपल्या आदेशात म्हटले आहे.

१९९६ पासून हे चिन्ह आपल्याडे असल्याचे समता पार्टीने दावा केला आहे. तर दुसरीकडे अंधेरीपूर्व निवडणूकीत आपला उमेदवार देण्याची घोषणाही समता पार्टीने केलेला आहे. “२००४ साली समता पार्टीची राज्यपक्ष म्हणून मान्यता काढून घेत असल्याचे सांगत उद्धव ठाकरे यांच्या गटाला मशाल हे चिन्ह देण्यात आले आहे,” असे समता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष त्रुनेश देवळेकर यांनी यापूर्वीच सांगितले होते

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!