Just another WordPress site

टोमॅटोची आवक वाढल्याने दरात घसरण, ८० रुपयांवरुन दर २५ ते ३० रुपयांवर, बळीराजा रडकुंडीला

सध्या राज्यातील टोमॅटो उत्पादक शेतकरी अडचणीत आला आहे. कारण सध्या टोमॅटोच्या दरात मोठी घसरण झाली आहे. बाजारात टोमॅटोची आवक वाढल्यानं दरात घसरण झाली आहे. ८० रुपयांवरुन टोमॅटोचे दर थेट २५ ते ३० रुपयांवर आल्यामुळं शेतकरी संकटात सापडला आहे. सध्या टोमॅटोची निर्यातही मंदावली आहे. दहा दिवसांत दर जवळपास निम्म्यावर आले आहेत.

सध्या बाजारात टोमॅटोची आवक वाढल्यानं टोमॅटोच्या दरात मोठी घसरण झाली आहे. ८० रुपयांवरुन टोमॅटोचे दर हे थेट २५ ते ३० रुपयांवर आले आहेत. टोमॅटोचे दर आणखी गडगडण्याची शक्यता आहे. त्यामुळं टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांना आणखी आर्थिक फटका बसण्याची शक्यता आहे. सध्या कर्नाटक आणि मध्य प्रदेशातून राज्यात टोमॅटोची आवक होत आहे. त्यामुळं दर घसरत आहेत.

दिवाळीनंतर चांगला दर मिळण्याची होती अपेक्षा

मागील एक महिन्याचा विचार केला तर, वातावरणातील बदल, अवकाळी पाऊस यामुळं टोमॅटो उत्पादक शेतकरी हतबल झाला होता. या अतिवृष्टीमुळं शेतकऱ्यांच्या पिकांचं मोठं नुकसान झालं होतं. मात्र, शेतकऱ्यांची दिवाळी अडचणीत गेली. मात्र आता दिवाळीनंतर तरी शेतकऱ्यांच्या राहिलेल्या मालाला चांगला दर मिळेल अशी अपेक्षा होती. पण तसे चित्र सध्या दिसत नाही. सध्या टोमॅटोच्या दरात मोठी घसरण झाली आहे. १० ते १५ दिवसांची तुलना केली तर टोमॅटोचे दर ८० रुपयांवर गेले होते. आता मात्र, हे दर २५ ते ३० रुपयांवर खाली आहे आहेत. बाजापरेठेत टोमॅटोची आवक मोठ्या प्रमाणात झाली असल्यानं दर घसरल्याची माहिती यावेळी नाशिक बाजारातील विक्रेत्यांनी दिली. हे दर आणखी घसरण्याची शक्यता देखील विक्रेत्यांनी व्यक्त केली आहे.

गिरणारेच्या बाजारात टोमॅटोच्या दरात मोठी घसरण

काही दिवसांपासून नाशिकमधील गिरणारेच्या बाजारपेठेत सुरु असलेल्या टोमॅटोच्या आवकेत वाढ झाली आहे. त्यामुळं तिथेही टोमॅटोच्या बाजारभावात घसरण पाहायला मिळत आहे. नाशिक जिल्ह्यात कांद्यासाठी लासलगाव बाजारपेठ सर्वात महत्वाची समजली जाते. त्याचप्रमाणे अलीकडच्या वर्षात गिरणारे बाजारपेठ भाजीपाला त्यातही टोमॅटो पिकासाठी महत्वाची मानली जाते. गिरणारे परिसरातील हजारो शेतकरी टोमॅटो पिकाचे उत्पादन घेत असून या बाजारपेठेत कोटींची उलाढाल होते. यंदा नाशिक भागातील टोमॅटो उत्पादकांत दांडगा उत्साह होता. वातावरणातील बदलाने सतत फटका दिल्यामुळे पारंपारिक द्राक्ष उत्पादकही बागा तोडून टोमॅटोकडे वळले आहेत. त्यामुळे गिरणारे परिसरात टोमॅटो लागवड मोठ्या प्रमाणावर पाहायला मिळत आहे. लहानात लहान शेतकरी देखील भाताचे एक वावर कमी करून टोमॅटो लागवड करण्यावर भर देत आहेत. अशातच यंदा झालेल्या जोरदार पावसाने त्यातही परतीच्या पावसाने टोमॅटो पिकाला मोठा तडाखा बसला.

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!