Just another WordPress site

मध्य प्रदेशातील मुरैना जिल्ह्यात भीषणअपघात; बोलेरो-डंपरच्या धडकेत पाच जण जागीच ठार

ग्वाल्हेर : मध्य प्रदेशातील मुरैना जिल्ह्यात एक भीषण अपघात झाला आहे. बोलेरो आणि डंपर समोरासमोर धडक झाल्याने पाच जण ठार झाले आहेत. तर तिघे हे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना ग्वाल्हेर येथील रुग्णालयात भरती केले असून उपचार सुरू आहेत. ही घटना आज पहाटेच्या सुमारास घडली. पोलिस घटनास्थळी पोहचले असून मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आले आहेत.

मुरैना येथील नूराबाद पोलिसठाण्याच्या हद्दीतील महामार्ग क्रमांक ४४ वर हा अपघात झाला. काही नागरिक हे बोलेरोतून परत ग्वाल्हेर येथून येत होते. यावेळी पाठीमागुन आलेल्या भरधाव वेगतील डंपरवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने डंपरने बोलेरोला पाठीमागुन जोरदार धडक दिली. ही धडक एवढी जोरदार होती की बोलेरोचा चक्काचूर झाला. यात जागेवरच ५ नागरिकांचा मृत्यू झाला.

या अपघाताची माहिती मिळताच पोलिस हे घटलस्थळी पोहचले. या घटनेत जखमींना तातडीने रुग्णालयात पाठवण्यात आले. मात्र, उपचारांपूर्वी तिघांचा मृत्यू झाला. तर घटनास्थळी दोघांचा मृत्यू झाला. तिघे जण गंभीर असून त्यांची प्रकृती ही चिंताजनक असल्याचे सांगितले जात आहे. त्यांच्यावर ग्वाल्हेर येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मृत आणि जखमी हे बित्तोली येथील रहिवाशी काल रात्री घरी परतत होते. यावेळी त्यांच्यावर काळाने घाला घातला.

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!