Just another WordPress site

टिळकांच्या वारसादर असलेलल्या भाजप आं. मुक्ता टिळक यांचं निधन, अशी होती राजकीय कारकीर्द!

पुणे : पुण्यातील कसबा मतदारसंघाच्या भाजपच्या आमदार तथा पुण्याच्या माजी महापौर मुक्ता टिळक यांचं निधन झालं आहे. त्या ५७ वर्षांच्या होत्या. गेल्या अनेक महिन्यांपासून त्या कर्करोगाशी झुंजत होत्या. पुण्यातील गॅलेक्सी केअर रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते. तिथेच त्यांनी अखेरचा श्वास घेतला. भाजपच्या प्रामाणिक कार्यकर्त्या, पक्षादेशाला त्यांनी नेहमी प्रमाण मानून राजकीय जीवनात काम केलं. अगदी कर्करोगाशी झुंजत असताना त्यांनी व्हिलचेअर बसून मुंबईत येऊन राज्यसभा आणि विधान परिषद निवडणुकीकरिता मतदान केलं. कर्तव्यनिष्ठेला महत्त्व देणाऱ्या कार्यकर्त्या आज आमच्यातून गेल्या, अशा भावना पुणे भाजपचे पदाधिकारी करत आहेत.

मुक्ता शैलेश टिळक २०१९ च्या राज्य निवडणुकीत भारतीय जनता पक्षाच्या सदस्या म्हणून कसबा पेठेतून विधानसभेवर निवडून आल्या होत्या. २०१७ ते २०१९ या काळात त्या पुण्याच्या महापौर होत्या. महापौर म्हणून केलेल्या कामावर खूश होऊन पक्षाने त्यांना विधानसभेची उमेदवारी दिली. गिरीश बापट यांच्या कसबा मतदारसंघातून त्यांनी दणक्यात विजय मिळवून विधानसभेत पाऊल ठेवलं. पण त्याचवेळी त्यांनी कर्करोगाची लागण झाली. पुढे दोन ते अडीच वर्ष त्यांना कर्करोग आणि अनेक व्याधींनी ग्रासलं होतं. त्यामुळे सार्वजनिक जीवनातला त्यांचा वावर अतिशय कमी झाला होता. पण रुग्णालयातून त्या लोकांची कामे करत राहिल्या, अधिकाऱ्यांना सूचना देत राहिल्या. पण आज कर्करोगाशी सुरु असलेली त्यांची झुंज अपयशी ठरली.

मुक्ता टिळक यांनी २०१७ ते २०१९ या काळात पुण्याचे महापौरपद भूषवले होते. त्या भाजपच्या पहिल्या महापौर असल्याचीही माहिती आहे. मुक्ता टिळक या बाळ गंगाधर टिळक यांचे नातू जयंतराव टिळक यांच्या सूनबाई होत्या. अर्थात बाळ गंगाधर टिळकांच्या त्या पणतसून होत्या. मुक्ता टिळक ह्या पुण्याच्या मुलीच्या भावे स्कूलच्या विद्यार्थिनी होत्या. त्यांचे पदवीपर्यंतचे कॉलेजचे शिक्षण फर्ग्युसन महाविद्यालयातून झाले होते. मानसशास्त्र विषयातून एम.ए झालेल्या मुक्ताताईंनी पुणे विद्यापीठाच्या परकीय भाषा विभागातून जर्मन भाषेचे शिक्षण घेतले होते. त्या मार्केटिंग विषयाच्या एमबीए होत्या शिवाय त्यांनी पत्रकारितेचा अभ्यासक्रमही पूर्ण केला होता.

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!