Just another WordPress site

‘बिचुकले दात घासत नाही आणि वॉशरूममध्ये तर…’ ड्रॉमा व्कीन राखीने सावंतने सांगितला ‘तो’ किस्सा

खरंतर बॉलिवूडची नौटंकी क्वीन राखी सावंत काहीना काही कारणाने चर्चेत असते. कधी वादामुळे राखी चर्चेत असते. तर कधी ती पर्सनल आयुष्यामुळे चर्चेत असते. कधी हटके फॅशन, तर कधी अजबगजब वक्तव्य करून चर्चेत राहायला तिला आवडतं, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. राखी ती नेहमीच धुमाकूळ घालत असते. आता राखी पुन्हा एकदा चर्चेत आली. पण, यावेळी कारण वेगळं ठरलंय. काही दिवसांपूर्वी वाइल्ड कार्डद्वारे ‘बिग बॉस’च्या घरात राखी सावंतने एन्ट्री घेतली होती. दरम्यान, बिस बॉसच्या एका एपिसोडमध्ये राखीने अभिजीत बिचकुलाचा एक किस्सा सांगितलाय.

‘बिग बॉस मराठी’चं चौथं पर्व अधिक रोमांचक होत चाललंय. राखी सावंतने घरात एन्ट्री घेतल्यापासून सदस्यांसोबत ती बरीच धम्माल मस्ती करताना दिसतेय. कधी ती सदस्यांना आपल्या तालावर नाचायला भाग पाडतेय तर कधी कोणाला आपल्या प्रेमात पडायची जबरदस्ती देखील करताना दिसतेय. आता राखीच ती… काय करेल याचा नेम नाही. तिच्या वागण्याने अक्षरशः हैदोस घातलाय. राखीने या आधी बिग बॉस १५ हिंदीही गाजवलंय. तिने हे पर्व गाजवलं होते. यावेळी तिच्या सोबत अभिजीत बिचुकले देखील होता. त्यावेळी राखी आणि अभिजित यांच्यामध्ये चांगले होते. त्याचेच काही भन्नाट किस्से राखीने बिग बॉस मराठीमध्ये उघड केले. आता मराठी बिग बॉसमध्ये राखीने अभिजित बिचुकलेचा एक किस्सा सांगितलाय. अभिजित किती आळशी आहे हे देखील राखीनं सांगितलं. तिनं सांगितलं की, ‘अभिजीत बिचुकले फार लोकप्रिय होता. पण तो हा शो जिंकू शकला नसता. कारण तो दिवसभर झोपून असायचा. कोणत्याही टास्क किंवा खेळात तो सहभाग घ्यायचा नाही. पुढं बोलतांना राखीनं सांगितलं की, ‘अभिजीत बिचुकलेला घरातील वॉशरुम वापरायचं असायचं, तेव्हा तो घरातील सगळ्या सदस्यांना वॉशरुममधून बाहेर काढायचा. तो दिवसभर दातही घासायचा नाही आणि माझ्या तोंडातून बासुंदीचा वास येतो, असं सगळ्यांना सांगत सुटायचा.’

अभिजीत बिचुकलेने बिग बॉस हिंदी १५ व्या पर्वात वाइल्ड कार्ड एण्ट्री घेतली होती. याच सिझनमध्ये देवोलीना भट्टाचार्जी देखील सामील झाली होती. शोमध्ये देवोलीना आणि अभिजीत यांच्यामध्ये चांगले मैत्रीचे नाते होते. अभिजीत आणि देवोलीच्या एक धक्कादायक किस्साही राखीने यावेळी सांगितला. तिनं सांगितलं की, ‘आमच्याबरोबर देवोलीना भट्टाचार्जीही होती. ती अभिजीतची सगळी कामं करायची. त्याच्यासाठी ती जेवणही बनवायची. पण, बिचुकलेने सर्वात आधी तिलाच नॉमिनेट केलं होतं. मी तुमची बेस्ट फ्रेंड आहे, मग मलाच का नॉमिनेट करताय, असं देवोलिना बिचुकलेला विचारलं तेव्हा बिचुकले तिला म्हणाला होता, मग काय झालं, मी तुलाच नॉमिनेट करणार. तू घराच्या बाहेर निघ, असं अभिजीनं देवोलीना ठणकावल असल्याचं राखीनं सांगितलं.
दरम्यान, ‘बिग बॉस मराठी’च्या चौथ्या पर्वाचे आता काहीच आठवडे शिल्लक आहेत. खेळात टिकून राहण्यासाठी स्पर्धकांना नवे डावपेच आखावे लागणार आहेत. त्यामुळे आता खेळ अधिक रंजक होणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!