Just another WordPress site

दिशा सालियान प्रकरणात खा. शेवाळे अडचणीत; एसआयटी मार्फत चौकशी करण्याचे निलम गोऱ्हे यांचे निर्देश

नागपूर : हिवाळी अधिवेशनामध्ये आज दिशा सालियान प्रकरणाची एसआयटी चौकशी एसआयटी मार्फत होणार असल्याची घोषणा केली आहे. तर, दुसरीकडे शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळे यांच्या बलात्कार आणि विनयभंग प्रकरणाचीही एसआयटी मार्फत चौकशी करावी, असे निर्देशच विधान परिषदेच्या सभापती निलम गोऱ्हे यांनी सरकारला दिले आहे.

खासदार राहुल शेवाळे यांनी लोकसभेत दिशा सालियान प्रकरण उकरून काढले. त्यानंतर आज हिवाळी अधिवेशनामध्ये शिंदे गटाचे आमदार आणि भाजपच्या आमदारांनी मागणी लावून धरली.

तर दुसरीकडे, विधान परिषदेमध्ये ‘खासदार राहुल शेवाळे यांनी महिलेला फसवून तिच्यावर बलात्कार केला आहे. याबाबत मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले आहे. या खासदारावर गुन्हा दाखल करा याचीही SIT चौकशी करावी अशी मागणीच शिवसेनेचे आमदार अनिल परब यांनी केली. परब यांच्या मागणीमुळे सभागृहात गदारोळ झाला. दोन्ही सत्ताधारी व विरोधक वेलमध्ये निदर्शनं केली.

मनीषा कायंदे यांनी ‘सत्ताधारी पक्ष AU म्हणून गदारोळ आदित्य ठाकरे यांच्या नावाला जोडून घातला जात आहे, या संदर्भात मी आज उप मुख्यमंत्र्यांना एक पत्र दिलं आहे. एका महिलेने साकीनाका पोलीस स्टेशनमध्ये एक तक्रार केली आहे. या संदर्भात तिने पंतप्रधान यांना देखील ट्विट केलं. पण खासदारावर आरोप असल्याने याची दखल घेतली जात नाही आहे. फडणवीस यांना दिलेल्या पत्रात मी याचा उल्लेख केला आहे, त्या महिलेच्या जीवाला राहुल शेवाळे पासून धोका आहे. पण याची दखल घेत नाही. पोलिसांवर कोणाचा दबाव आहे, एका बाजूने महिलेच्या रक्षणाची गोष्टी करतात आणि महिलेवर अन्याय केला जात आहे, या प्रकरणाची चौकशी करा, अशी मागणी केली.

त्यामुळे सभागृहात एकच गोंधळ उडाला. सत्ताधारी भाजपच्या आमदारांनी गोंधळ घातला. त्यामुळे सभापती नीलम गोऱ्हे यांनी यावर उत्तर देण्याचे निर्देश केले. पण, गोंधळामुळे सरकारकडून कुणीच बोलायला तयार नव्हते, त्यामुळे गोऱ्हे यांनी राहुल शेवाळे प्रकरणाच्या चौकशीसाठी एसआयटी स्थापन करून चौकशी करावे असे निर्देश दिले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!