Just another WordPress site

खातेदारांनो सावधान, SBI मधील सायबर फसवणुकीत तब्बल तीनपट वाढ !

Threefold increase in cyber fraud in SBI! : देशात एकीकडे भ्रमणध्वनी आणि ‘इंटरनेट बँकिंग’च्या (‘Internet Banking’) सोयी वाढत असतानाच दुसरीकडे सायबर फसवणूकही (cyber fraud) वाढत आहे. देशातील अग्रगण्य आणि सर्वांत मोठी बँक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या स्टेट बँक ऑफ इंडियाच्या (State Bank of India)देशभरातील शाखेत २०२० – २१ या आर्थिक वर्षाच्या तुलनेत २०२२-२३ वर्षामध्ये तिप्पट वाढ झाल्याचे माहितीच्या अधिकारातून पुढे आले आहे.

 

तंत्रज्ञानाच्या आगमनाने जीवन खूप सोपे झाले आहे. प्रत्येक कामात आता Technology चा वापर होतो. त्याशिवाय, दैनंदिन आयुष्याची कल्पना करणेच अशक्य झाले आहे. वीज बिल भरणे, तिकीट बुक करणे, यासह अनेक महत्वाची कामं करण्यासाठी इंटरनेटचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जात आहे. पण, इंटरनेटच्या अतिवापरामुळे बँकिंग फसवणूक, Cyber Attacks , Online Scams आणि इतर अनेक सायबर गुन्ह्यांमध्ये देखील मोठ्या प्रमाणात वाढ झाली. मात्र, सायबर क्राईमध्ये फारच वाढ झाली.

 

स्टेट बँकेचे केंद्रीय जन माहिती अधिकारी व उपमहाव्यवस्थापक ईश्वरचन्द्र शाहू यांनी सामाजिक कार्यकर्ते अभय कोलारकर यांना दिलेल्या माहितीनुसार, २०२०- २१ या आर्थिक वर्षात देशभरात स्टेट बँकेत सायबर फसवणुकीचे २१ प्रकरण घडले. त्यात बँकेची २.७४ कोटींनी फसवणूक झाली. २०२१-२१ मध्ये येथे ३२९ प्रकरणांमध्ये बँकेची ४.४५ कोटी रुपयांनी तर २०२२-२३ या वर्षात ७२२ प्रकरणांमध्ये तब्बल ९.२३ कोटींनी फसवणूक झाली. त्यामुळे सायबर फसवणुकीचे प्रकरण स्टेट बँकेत वाढताना दिसत आहे. त्यातही सर्वाधिक सायबर फसवणूक ‘इंटरनेट बँकिंग’मध्ये झाली. मिळालेल्या माहितीनुसार, सन २०२०-२१ या आर्थिक वर्षात फसवणुकीच्या चार प्रकरणात २.६४ कोटी रुपयांची फसवणुक झाली, सन २०२१- २२ मध्ये एकून २२४ प्रकरणांत ३.९१ कोटी, तर २०२२-२३ मध्ये ३३२ प्रकरणांत ६.२४ कोटींनी फसवणूक झाल्याचेही माहितीच्या अधिकारातून पुढे आले.

 

कॉल करा
काही दिवसांपूर्वी एसबीआयने जारी केलेल्या एका परिपत्रकात म्हटले आहे की, तुमच्या खात्यात कोणताही अनधिकृत व्यवहार झाल्यास किंवा तुमची आर्थिक फसवणुक झाल्यास ताबडतोब १८००१-२-३-४ या टोल फ्री क्रमांकावर कॉल करा. त्यामुळे वेळीच योग्य ती कारवाई होऊ शकते.

 

काय खबरदारी घ्याल?
– कोणत्याही अनोळखी इसमाला तुमची जन्मतारीख, डेबिट कार्ड क्रमांक, इंटरनेट बँकिंग आयडी OTP ओटीपी देऊ नका.

– SBI, RBI,शासकीय कार्यालय, पोलीस, केवायसी प्राधिकरण अशा विविध नावाने फसवणूक करणाऱ्या लोकांपासून सावध राहा.

– SBI ग्राहकांनी दूरध्वनी कॉल / ई मेल यासारख्या ठिकाणी येणाऱ्या काही अज्ञात लिंकवरु कोणतेही मोबाइल अ‍ॅप डाउनलोड करू नये

 

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!