Just another WordPress site

‘राज्यात लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकत्र….’; आगामी निवडणुकांविषयी बावनकुळेंचं वक्तव्य

Chandrasekhar Bawankule Said Lok Sabha-Assembly elections will not be combined in the state:आगामी वर्ष हे निवडणूकांचे वर्ष आहे. पुढच्या वर्षी देशात लोकसभा (Lok Sabha) तसेच राज्यात नगरपालिका आणि विधानसभा निवडणुका (Assembly elections) होणार आहेत. दरम्यान, लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका एकाच वेळी होणार असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे. दरम्यान, अशातच भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी (Chandrasekhar Bawankule) आगामी निवडणुकांविषयी मोठं वक्तव्य केलं. सध्या लोकसभ आणि विधानसभा निवडणुका एकत्र होण्याची शक्यता नसल्याचं बावनकुळेंनी सांगितलं.

लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकत्र घेतल्यास मोदी लाटेचा फायदा मिळेल, असा विश्वास भाजपला आहे. त्यामुळेच मोदींनी एकत्रित निवडणुकांना पाठिंबा दिला आहे. केंद्र सरकारने ‘वन नेशन, वन इलेक्शन’कडे वाटचाल करण्याची तयारी सुरू केली असून आगामी निवडणुका एकाच वेळी होणार असल्याचे बोलल्या जातं आहे. आगामी लोकसभा निवडणुकीसोबतच राज्यात विधानसभा निवडणुकाही होणार असल्याच्या बातम्या काही माध्यमांनी प्रसिद्ध केल्या होत्या. दरम्यान, लोकसभा- विधानसभा निवडणूका एकत्र होणार असल्याच्या चर्चेवर बोलताना बावनकुळे यांनी सांगितले की, मला विधानसभा आणि लोकसभेच्या निवडणूका एकत्र होतील अशी शक्यता वाटत नाही. आणि का व्हाव्यात? कारण लोकसभेनंतर पुढे सहा-साडेसहा महिने उरतात.

Madhuri Dixit Birthday : बाबो! माधुरी 250 करोडची मालकीण अन् महिन्याला कमावते…

त्यामुळं आत्ताच याविषयी अंदाज व्यक्त करणे घाईचं ठरेल. खरंतर निवडणूका एकत्र होण्याचं काही कारणच नाही. लोकसभा आणि विधानसभा निवडणूका एकत्र होतील अशी शक्यता तुर्तास तरी दिसत नाही, असे चंद्रशेखर बावनकुळे माध्यमांशी बोलतांना सांगितलं.

दरम्यान, कर्नाटकातील दारुण पराभवानंतर महाराष्ट्रात भाजपला आत्मपरीक्षणाची गरज नसल्याचा दावा बावनकुळे यांनी केला. महाराष्ट्रातील सर्व निवडणुकांमध्ये भारतीय जनता पक्ष हा क्रमांक एकचा पक्ष आहे, असे ते म्हणाले. महाराष्ट्रात भाजप-शिवसेनेचे सरकार आहे. सरकार आणि संघटना मिळून आम्ही ५१ टक्के मतांसाठी तयारी करत आहोत. कर्नाटकात काँग्रेसच्या विजयाची वेगवेगळी कारणे आहेत. तिथले राजकारण, मुद्दे वेगळे आहेत. कर्नाटकचा महाराष्ट्राशी काहीही संबंध नाही. एका निवडणुकीत फायदा झाला तर दुसऱ्या निवडणुकीत फायदा होईलच असे नाही.

 

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!