Just another WordPress site

आशा पारेख यांना यंदाचा दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर

मुंबई: केंद्र सरकारकडून ‘दादासाहेब फाळके पुरस्कार २०२०’ जाहीर करण्यात आला असून केंद्रीय मंत्री अनुराग ठाकुर यांनी याबाबत घोषणा केली. दादासाहेब फाळके पुरस्काराच्या मानकरी ज्येष्ठ अभिनेत्री आशा पारेख ठरल्या आहेत. ठाकुर यांनी त्यांच्या नावाची घोषणा करताच त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होतो आहे.
भारतीय चित्रपट क्षेत्रातील हा सर्वोच्च पुरस्कार केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांनी जाहीर केला. पारेख यांना दादासाहेब फाळके पुरस्कार २०२० जाहीर करण्यात आला आहे. ७९ वर्षीय अभिनेत्री ‘दिल देके देखो’, ‘कटी पतंग’, ‘तीसरी मंझील’ आणि ‘कारवां’ यासारख्या सिनेमांसाठी प्रसिद्ध आहेत. हिंदी चित्रपटसृष्टीतील आतापर्यंतच्या सर्वात प्रभावशाली अभिनेत्रींपैकी त्या एक आहेत. त्यांनी निर्माती दिग्दर्शक म्हणूनही ओळख मिळवली. पारेख यांनी १९९० साली आलेल्या प्रसिद्ध टीव्ही मालिका ‘कोरा कागज’चे दिग्दर्शन केले होते.
Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!