Just another WordPress site

यंदा गणपतीची मुर्ती शाडू मातीचीच, प्रशानसनाचा निर्णय

This year the homemade Ganesha idol belongs to Shadu : यावर्षी गणेशोत्सवात घरगुती गणेशमूर्ती (Ganesha idol) शाडूची माती (Shadu soil) किंवा पर्यावरणपूरक घटकांपासून घडविणे मुंबई महापालिकेकडून बंधनकारक करण्यात आले आहे. तसेच शाडूच्या मातीपासून गणेशमूर्ती घडविण्यासाठी मूर्तिकारांना प्रत्येक विभागात एक जागा मोफत उपलब्ध करून देण्याचे निर्देश मुंबई महापालिका (Mumbai Municipality) आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी आज एका विशेष बैठकीत दिले.

‘प्लास्टर ऑफ पॅरिस’च्या मूर्तीवर बंदी घालण्याच्या निर्णयाची टप्प्याटप्प्याने अंमलबजावणी करण्यात येणार आहे. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या मूर्तींना पर्यावरणपूरक पर्याय देण्यासाठी तज्ज्ञांची समिती नेमण्याची घोषणा बुधवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली होती. त्यामुळे सार्वजनिक मंडळांच्या मूर्तीबाबत अद्याप निर्णय झालेला नाही. मात्र, चार फूट उंच घरगुती गणेशमूर्ती शाडूची माती किंवा पर्यावरणपूरक घटकांपासूनच घडविणे बंधनकारक करण्यात आले आहे.

शाडूच्या मूर्ती घडवणाऱ्या मूर्तिकारांना जागेची कमतरता भासण्याची शक्यता आहे. ही बाब लक्षात घेऊन मूर्तिकारांना अशा गणेशमूर्ती घडविण्यासाठी पालिकेच्या प्रत्येक विभागात एक जागा मोफत उपलब्ध करून देण्याचे निर्देश आयुक्तांनी दिले.

‘पीओपी’ गणेशमूर्तींची विक्री किंवा वापर करण्यास मनाई आहे. तसेच पीओपी मूर्तींचे विसर्जन केल्याने जलप्रदूषण होते. त्यामुळे पर्यावरणाचे हित लक्षात घेऊन यंदाच्या गणेशोत्सवादरम्यान पीओपी मूर्तींची विक्री अथवा खरेदी करू नये, तर शाडू मातीच्या मूर्ती बसवाव्यात, असे आवाहन पालिकेने केले आहे. यासोबतच घरगुती गणेशमूर्तींचे कृत्रिम तलावात विसर्जन करणे सोयीचे व्हावे यासाठी मूर्तींची उंची चार फुटांपेक्षा जास्त नसावी, असंही पालिका प्रशासनाने स्पष्ट केलं.

माती उपलब्ध करण्याचे आदेश….

पर्यावरणपूरक गणेशमूर्ती तयार करण्यास प्रोत्साहनमिळावे, या उद्देशाने प्रायोगिक स्तरावर काही प्रमाणात शाडू माती उपलब्ध करून देण्याचेही निर्देश आयुक्तांकडून परिमंडळीय उपायुक्तांना देण्यात आले आहेत. यासाठी राज्यातील विविध भागातून किंवा आवश्यकता भासल्यास अन्य राज्यातून शाडूची माती आणून त्याचा मूर्तिकारांना पुरवठा करावा, असेही निर्देश परिमंडळीय सह आयुक्त, उपायुक्तांना देण्यात आले. त्याचबरोबर मुख्यमंत्र्यांच्या निर्देशांनुसार सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या मंडपांसाठी आकारले जाणारे शुल्क आणि  अनामत रक्कम माफ करण्याचाही निर्णय घेण्यात आला. गेल्या वर्षी गणेशोत्सवानिमित्त गणेशोत्सव मंडळांकडून घेतलेले शुल्क व अनामत रक्कम महानगरपालिकेकडे जमा आहे. ते त्यांना पुढील सात दिवसांमध्ये परत करण्याचेही निर्देश आयुक्त दिले.

 

महत्वाच्या बातम्या : 

१. आता कैदी करु शकतील घरच्यांना व्हिडीओ कॉल, कारागृह प्रशासनाचा निर्णय 

२. वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याची निवडणुक : मुंडे भावंड एकत्र येणार का? राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण

३. सर्जा-राजाची जोडी पुन्हा उधळणार, बैलगाडी शर्यतीला सप्रीम कोर्टाची परवानगी

४.  शेतकऱ्यांना सुगीचे दिवस! तुरीच्या दरात १ हजार १०५ रुपयांची वाढ; तुर १२ हजारांचा पल्ला गाठणार?

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!