Just another WordPress site

यंदाचं वर्ष निवडणुकांचं! ‘या’ ९ राज्यांत होणार विधानसभा निवडणुका, मोंदीची प्रतिष्ठा पणाला लागणार

नवी दिल्ली : नववर्षाची सुरुवात झाली असून २०२३ मध्ये तब्बल ९ राज्यांच्या विधानसभा निवडणुका पार पडणार आहेत. या निवडणुकांकडे लोकसभा निवडणुकीची सेमी फायनल म्हणून पाहिलं जात आहे. कर्नाटक, मध्यप्रदेश, छत्तीसगड, राजस्थान,तेलंगाना , नागालँड, त्रिपुरा, मेघालय, जम्मू काश्मीर मध्ये निवडणुका होणार आहेत. कर्नाटक, मध्य प्रदेश आणि त्रिपुरामध्ये भाजप सत्तेत आहे. राजस्थान, छत्तीसगडमध्ये काँग्रेस सत्तेत आहे. तर, मेघालयमध्ये नॅशनलिस्ट डेमोक्रॅटक प्रोग्रेसिव्ह पक्ष सत्तेत आहे. तेलंगाणामध्ये केसीआर यांच्या पक्षाची सत्ता आहे. त्यांनी नुकतंच त्यांच्या पक्षाचं नाव टीआरएसवरुन बीआरएस केलं आहे. जम्मू काश्मीरमध्ये विभाजनानंतर निवडणुका व्हायच्या आहेत.

कर्नाटकच्या विधानसभेची मुदत २४ मे रोजी संपणार आहे. त्यामुळं या राज्यात निवडणुका एप्रिल मे दरम्यान लागू सखतात. मिझोरम, छत्तीसगड, मध्यप्रदेश, राजस्थान, तेलंगाणा या राज्यांचा कार्यकाळ डिसेंबर २०२३ जानेवारी २०२४ मध्ये संपणार आहे. त्यापूर्वी निवडणुका जाहीर होऊ शकतात. मिझोरमच्या विधानसभेचा कार्यकाळ १७ डिसेंबरला संपणार आहे. त्यामुळं त्यापूर्वी निवडणूक होऊ शकते. छत्तीसगड आणि मध्य प्रदेशच्या विधानसभांचा कार्यकाळ ३ जानेवारी २०२४ आणि ६ जानेवारी २०२४ ला संपणरा आहे. राजस्थान आणि तेलंगाणा राज्यांच्या विधानसभांचा कार्यकाळ १४ आणि १६ जानेवारीला संपणार आहे. त्यामुळं या पाच राज्यांच्या निवडणुका एकाच वेळी होऊ शकतात, असा अंदाज वर्तवण्यात येत आहे.

जम्मू काश्मीरमध्ये निवडणूक होण्याची शक्यता आहे. २०२३ मध्ये थंडीचं प्रमाण कमी झाल्यानंतर विधानसभा निवडणूक जाहीर होऊ शकते.

२०२३ मध्ये पहिल्यांदा कर्नाटकमध्ये निवडणुका होणार आहेत.भाजपपुढं कर्नाटकमधील सत्ता राखण्याचं आवाहन आहे. बसवराज बोम्मई यांच्या पुढं सत्ता टिकवण्याचं आवाहन असून येडियुरप्पा यांची त्यांना साथ कशी मिळणार हे पाहावं लागेल. दुसरीकडे भाजपसाठी दक्षिणेचं दार उघडणाऱ्या रेड्डी बंधूंचं आव्हान असेल, त्यांनी नव्या पक्षाची स्थापना केली आहे. येडियुरप्पा आणि बोम्मई यांच्यापुढं कर्नाटकच्या डी.के. शिवकुमार, माजी मुख्यमंत्री सिद्धारामय्या आणि जेडीएसच्या कुमारस्वामी यांचं आव्हान आहे.

मध्य प्रदेशमध्ये गेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला सत्ता मिळाली होती. काँग्रेसमधील नेत्यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानं त्यांचं सरकार पडलं होतं. शिवराज सिंह चौहान अनेक वर्षांपासून मुख्यमंत्री म्हणून कार्यरत आहेत. राहुल गांधी यांनी मध्य प्रदेशमध्ये काँग्रेसची सत्ता येणार असल्याचं लिहून देतो, असं म्हणत भाजपला आव्हान दिलं आहे.

राजस्थान आणि छत्तीसगडमध्ये काँग्रेसपुढं आव्हान
राजस्थानमध्ये आणि छत्तीसगडमध्ये काँग्रेसची सत्ता आहे. दोन्ही राज्यांमधील सत्ता परत मिळवण्याचं आव्हान काँग्रेसपुढं असेल. छत्तीसगडमध्ये भूपेश बघेल आणि राजस्थानमध्ये अशोक गेहलोत आणि सचिन पायलट यांच्यावर सत्ता टिकवण्याचं आव्हान असेल.

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!